शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिंपी बांधवांसमोर स्पर्धेचे आव्हान, ‘रेडीमेड’मुळे ‘पारंपारिक’ व्यवसायाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 12:52 IST

जिजाबराव वाघ/आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २८ - ‘स्टाईलीश रेडीमेड’ कपड्यांमुळे पारंपारिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाची वीणच उसवली असून शिंपी बांधवांसमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. २८ फेब्रुवारी रोजी जागतिक टेलरिंग दिनी याचा आढावा घेतला असता, पारंपारिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे वास्तव समोर आले आहे.विवाह समारंभ ...

ठळक मुद्देस्पर्धा वाढल्याने उतरती कळाकुटूंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न

जिजाबराव वाघ/आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २८ - ‘स्टाईलीश रेडीमेड’ कपड्यांमुळे पारंपारिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाची वीणच उसवली असून शिंपी बांधवांसमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. २८ फेब्रुवारी रोजी जागतिक टेलरिंग दिनी याचा आढावा घेतला असता, पारंपारिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे वास्तव समोर आले आहे.विवाह समारंभ असो की सण उत्सव नविन कपडे परिधान करुन तो साजरा करतांना त्याला नाविन्याची झळाळी येते. पूर्वी कपडे शिंपींकडून कपडे शिवून घेण्याची लगबग असायची. दुकानातून कापड आणून ड्रेस शिवण्यासाठी शिंपी बांधवांकडे दिले जायचे. १९९० नंतर तयार म्हणजेच रेडीमेड स्टाईलिश आणि फ?शनेबल कपड्यांचा ट्रेंड आल्याने पारंपारिक पद्धतीने कपडे शिवण्याच्या व्यवसायासमोर हे आवाहन होते. यानंतर गेल्या तीस वर्षात रेडीमेड व्यवसायाने जम बसाविला तर कालौघात पारंपारिक शिवणकाम मरणपंथाला लागले. ग्रामीण भागात आलुतेदार - बलुतेदार पद्धतीने कपडे शिवले जात. मात्र अलिकडच्या काही वर्षात हे चक्र देखील मोडकळीस आले आहे. सर्वांचाच तयार कपडे घेण्याकडे कल वाढल्याने कारागिर असणा-या शिंपींना एकतर मोठ्या महानगरात स्थलांतर करावे लागले. काहींनी उदरनिवार्साठी वेगळा व्यवसाय सुरु केला.स्पर्धा वाढल्याने उतरती कळाग्रामीण भागातही रेडीमेड कपडे मिळू लागले आहेत. शहरात आणि मेट्रो सिटीज मध्ये तर बड्या कंपनांच्या शोरुमने बस्तान बसविले आहे. याबरोबरच 'वन गेट बाय टू' या फ्री संस्कृतीनेही ग्राहकांना भुरळ घातली. धावपळीच युग असल्यानेही कपडे शिवून घेण्याची वेळखाऊ पद्धत मागे पडली. पारंपारिक कपडे शिवण्याचा व्यवसाय अशा समस्यांच्या चक्रात अडकला आहे.आभाळच फाटले, टाके घालायचे कुठेकाळाची पावले ओळखून पारंपारिक व्यवसायात फारसे बदल झाले नाही. नव्या ट्रेंडसचा अंगिकार न करणे, अत्याधुनिक यंत्रांची कमतरता, नव्यानव्या स्टाईल जाणून घेण्यासंबंधीचा अभाव, साधनांचा तुटवडा अशा नानाविध प्रश्नांनी पारंपारिक व्यवसायाचे आभाळच फाडले. त्यामुळे सद्यस्थितीत शिंपींना रफू करणे, बटन लावणे, ऊसवलेले शिवून देणे, चेन बसविणे अशी फुटकळ कामेच उरली आहेत. त्यांचे संघटनही नसल्याने समस्येची तीव्रता समोर ठळकपणे समोर येत नाही.कुटूंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्नउदारीकरणामुळे सर्वच पारंपारिक व्यवसायांना नख लागले. मात्र यात न्हावी बांधवांनी काळाची पावले ओळखून सलून दुकानांना स्टाईलिश केले. नव्या ट्रेंडचा स्विकारही केला. इतर पारंपारिक व्यवसाय मात्र उदारीकरणाच्या टाचेखाली चिरडले गेले. एकट्या चाळीसगाव शहर व तालुक्यात एक हाजाराहुन अधिक कपडे शिवणा-या शिंपी कुटुंबांसमोर व्यवसाय बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. सर्वदुर हीच परिस्थिती असल्याने समस्येची धग लक्षात यावी. अनेकांनी दुसरा पर्याय शोधला आहे.२८ फेब्रुवारी रोजी जागतिक टेलरिंग दिन साजरा केला जातो. १७९० मध्ये अमेरिकेत सर विल्यम इलिआस होव यांनी शिवणयंत्राचा शोध लावला. त्यांना शिवणयंत्रांचे जनक संबोधले जाते. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ टेलरिंग दिन जगभर साजरा केला जातो. १९२७ मध्ये ‘टेलर’ हा शब्द हॉवर्ड विद्यापिठाने डिक्शनरीत समाविष्ट केला.रेडीमेड कपड्यांमुळे आमच्या पारंपारिक व्यवसायासमोर आवाहनच नव्हे तर अस्तित्वालाही धक्का दिला आहे. अनेक कुटुंबांवर उपासमारीचे आरिष्ट कोसळले आहे. काहींना स्थलांतर करावे लागले असून काहींना अन्य व्यवसाय, मजुरी अशी कामे करावी लागत आहे. तरुणांनी नव्या ट्रेंडसचा स्विकार केला तर त्यांना चांगली संधीही आहे.- सुरेंद्र शिंपी, टेलर चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव