शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

vidhan sabha 2019 : जळगाव जिल्ह्यात वर्चस्व कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:42 IST

गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी

जळगाव : पूर्वीपासूनच भाजपचा गड असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत युती न करता वेगवेगळे लढलेल्या भाजपला सहा तर शिवसेनेला तीन मतदारसंघात विजय मिळाला. यात भाजपने जळगाव शहर मतदार संघ शिवसेनेकडून, चाळीसगाव राष्ट्रवादीकडून, रावेर अपक्षकडून आपल्याकडे खेचला होता तर जामनेर, मुक्ताईनगर या भाजपच्या पारंपारिक मतदार संघात भाजपचे आपले वर्चस्व कायम ठेवले. या वेळीही भाजपला आपले वर्चस्व टिकविण्याचे आव्हान असताना आघाडीही मोठी लढत देण्याचा दावा करीत आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात अशोक कांडेलकर यांना उमेदवारी देण्याची मागणी कोळी समाजाकडून होत आहे. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उमेदवारीसाठी ताकद लावत आहेत. विद्यमान आमदार असलेल्या जागा भाजपकडेच राहणार असे मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी संकेत दिल्याने जळगाव शहर मतदार संघात आमदार सुरेश भोळे निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र शिवसेनेच्याही उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहे, हे विशेष.जामनेरात तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पराभूत करण्याचे आव्हान राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्या चाळीसगाव मतदार संघात भाजपकडून सर्वाधिक इच्छुक असून खासदारांच्या सौभाग्यवतींचाही यात समावेश आहे.रावेर मतदार संघात राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी हेदेखील भाजपकडून फिल्डींग लावत आहे. चोपडा मतदार संघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना घरकूल प्रकरणात शिक्षा झाल्याने तेथे शिवसेनेच्या दुसऱ्या गटाकडून तयारी सुरू आहे.जळगाव ग्रामीण मतदार संघातही गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये लढत देणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे या वेळी देखील राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. मात्र त्यांनादेखील घरकूल प्रकरणात शिक्षा झाली आहे. एरंडोल मतदार संघाची एकमेव जागा राष्ट्रवादीकडे असून ती देखील आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा मनोदय असून तसे आव्हान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार डॉ. सतीश पाटील यांना दिले आहे.जळगाव जिल्ह्यातील ११ पैकी सहा मतदारसंघात भाजप, तीन शिवसेना, एक अपक्ष तर एका मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून सर्वच ११ मतदार संघात सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीशी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सामोरे जावे लागणार आहे, असे आजचे चित्र आहे. यात आता जिल्ह्यातील जळगाव शहर व रावेर असे दोनच मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आले असल्याने आघाडीत मतभेद निर्माण झाले तर आघाडी सत्ताधाऱ्यांना कसे सामोरे जाणार याकडे लक्ष आहे. जिल्ह्यात या निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसला अस्तित्वासाठीच लढाई लढावी लागणार आहे.पालकमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणालापालकमंत्री गिरीश महाजन यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवायची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भाजपमधील नेत्यांना बळ देतानाच दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. युती झाली तर युतीचे आमदार अन्यथा स्वबळावर लढले तर भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांच्यापुढे आहे. पालकमंत्री म्हणून महाजन यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.काँग्रेसचा भोपळा फुटणार?स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसचे मोठे अस्तित्व असलेल्या जिल्ह्यात गत निवडणुकीत प्रथमच एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. यावेळी कॉँग्रेस भोपळा फोडणार का? असा प्रश्न आहे.संजय सावकारे व शिरीष चौधरी२००९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले आमदार संजय सावकारे यांनी २०१४मध्ये भाजपमध्ये प्रवेश करीत निवडणूक लढविली व ते विजयीदेखील झाले. या वेळी त्यांच्याच भुसावळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांची भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. मात्र ते रावेरमधून इच्छुक असल्याने सावकारे यांना उमेदवारी मिळविण्याबाबत तेवढा दिलासा मानला जात आहे. दुसरीकडे महत्त्वाच्या अमळनेर विधानसभा मतदार संघातून प्रथमच व तेदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले आमदार शिरीष चौधरी यांनी विजय मिळविल्यानंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. या वेळी त्यांच्याही उमेदवारीकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.शिवसेनेच्या इच्छुकांच्या भूमिकेकडे लक्षजळगाव शहर मतदार संघातून शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक आहे. यामध्ये माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मुंबई येथे मुलाखतीदेखील दिल्या आहेत. त्यामुळे दोघांपैकी उमेदवारी कोणाला मिळते, हे जरी निश्चित नसले तरी युती झाल्यास ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.एकनाथराव खडसे यांची कसोटीपक्षाचे ज्येष्ठ नेते व खान्देशात भाजपला सत्ता मिळविण्यात मोठा हातभार असलेले एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघात शिवसेनेकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. युती झाल्यास जागा कोणाकडे जाणार असा प्रश्न आहेच, कोळी समाजाने वेगळी मागणी केल्याने खडसे यांची कसोटी राहणार आहे.नशिबी अन् कमनशिबी२०१४च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश भोळे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ४२ हजार ३१४ मतांनी विजय मिळविला होता. तर सर्वाच कमी म्हणजेच एक हजार ९८३ मतांचे मताधिक्य एरंडोल मतदार संघातून डॉ. सतीश पाटील यांना मिळाले होते. एकनाथराव खडसे यांनाही ९ हजार ७०८ मतांचे मताधिक्य मिळाले होते.‘वंचित’चे कायलोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार हवा निर्माण केली. जळगावसह रावेर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील सर्व अकरा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर इतर सर्वांचे लक्ष राहणार आहे.प्रथमच नशीब आजमावलेलेसुरेश भोळे (भाजप, जळगाव शहर)उन्मेष पाटील (भाजप, चाळीसगाव)किशोर पाटील (पाचोरा, शिवसेना)शिरीष चौधरी (अपक्ष, अमळनेर)विजयाची हॅट्ट्रिकएकनाथराव खडसे, (मुक्ताईनगर मतदार संघ)गिरीश महाजन (जामनेर मतदार संघ)सर्वांत ज्येष्ठ आमदारएकनाथराव खडसे (भाजप - ३० वर्षे)मनसेदेखील जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार असल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते.दुरंगी लढतजळगाव शहरमुक्ताईनगरजामनेरतिरंगी लढतचाळीसगावरावेरजळगाव ग्रामीणभुसावळचोपडापाचोराएरंडोलअमळनेर

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाJalgaonजळगाव