शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

चाळीसगावला सीसीआय केंद्रांवर नोंदणी थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:37 IST

तळेगाव केंद्रावर कपाशीने भरलेल्या वाहनांची रांग होती.

ठळक मुद्देकपाशीची विक्रमी आवक: १९० वाहनांमधील कपाशी मोजणीच्या प्रतीक्षेत२६ हजार क्विंटल कपाशीची मोजणी

चाळीसगाव : दोन दिवस लागून आलेली सुट्टी, पुन्हा लॉकडाऊन अफवेमुळेही मंगळवारी तळेगाव व भोरस येथील सीसीआयच्या दोन्ही खरेदी केंद्रांवर मोठ्या संख्येने कपाशी वाहनांची आवक झाल्याने नवीन नोंदणी थांबविण्यात आली आहे. सीसीआय व्यवस्थापनाने तसे पत्रच बाजार समितीला दिले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन नोंदणीसाठी वाहने आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.सीसीआय केंद्रांवर सात दिवसांपूर्वी कपाशी खरेदी सुरू झाली. सुरुवातीपासून खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या. रविवार आणि सोमवारी गुरुनानक जयंती असल्याने केंद्रे बंद होती. मंगळवारी खरेदी पुन्हा सुरू झाल्याने भोरस आणि तळेगाव केंद्रांवर पुन्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे नव्याने नोंदणी थांबवण्यात आली आहे. पुन्हा नोंदणी करण्याबाबत सीसीआय सूचना करणार आहे.प्रोसेसिंग धीम्या गतीने, कपाशी ठेवायला जागा नाहीकपाशी मोजणीचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शेतकऱ्यांची अगोदरच नाराजी आहे. सद्य:स्थितीत खरेदी केलेल्या कपाशीवर केंद्रांमध्येच प्रोसेसिंग केली जाते. मात्र हे कामही येथे धीम्या गतीने सुरू असल्याने केंद्रांमधील मोकळी जागा कपाशीने फुल्ल झाली आहे. कपाशी ठेवायला जागा नसल्याने सीसीआयने नवीन नोंदणी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना सोसावा लागतो भूर्दंडकपाशी भरलेली वाहने टोकननुसार उभी केली जातात. यामुळे शेतकऱ्यांना दर दिवशी ५०० रुपयांचा नाहक भूर्दंड सोसावा लागतो. वाहने एका दिवसासाठी ५०० रुपये अतिरिक्त भत्ता घेतात. मंगळवारी विक्रमी आवक झाल्याने तळेगाव व भोरस केंद्रावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.२९० वाहनांची आवक, १९० वाहने प्रतीक्षेतमंगळवारी तळेगाव केंद्रावर ८० तर भोरस केंद्रावर १५० वाहने व ५५ बैलगाड्यांमधून कापूस मोजणीसाठी आला. दिवसअखेर १०० वाहने व ५५ बैलगाड्यांमधील कपाशी मोजली गेली. अजुनही १९० वाहने मोजणीच्या प्रतिक्षेत आहे. नवीन नोंदणीबाबत सीसीआयने कळविल्यानंतरच पुढील निर्णय होईल. २६ हजार क्विंटल कपाशीची खरेदीतळेगाव व भोरस येथील केंद्रांवर गत आठ दिवसात २६ हजार क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली आहे. शनिवारअखेर १९ हजार तर मंगळवारी दोन्ही केंद्रांवर जवळपास सात हजार क्विंटल कपाशी मोजली गेली.  सीसीआयने नवीन नोंदणी थांबवल्याबाबत मंगळवारी पत्र दिले आहे. सद्य:स्थितीत केंद्रांवर कपाशी साठविण्यास जागा नाही. अजूनही १९०हून अधिक वाहने मोजणीसाठी उभी आहेत. पुढील सूचना येईपर्यंत शेतक-यांनी कपाशी नोंदणीसाठी वाहने आणू नयेत. नोंदणी सुरू करण्याविषयी लवकरच सूचना दिली जाईल.- सतीश पाटील, प्रभारी सचिव, बाजार समिती, चाळीसगाव,

टॅग्स :cottonकापूसChalisgaonचाळीसगाव