शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

चाळीसगाव, पाचो:याला भाजपा, भडगावला सेना

By admin | Updated: March 14, 2017 23:28 IST

पंचायत समिती सभापती निवड: उपसभापतीपदी अनुक्रमे भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादीला यश

चाळीसगाव/ पाचोरा/ भडगाव : पंचायत समिती निवडणुकीत चाळीसगावी सभापती व उपसभापती या दोन्ही जागांवर भाजपाने बाजी मारली. पाचोरा येथे सभापती भाजपाचा झाला. तर उपसभापतीपदी कॉंग्रेसला संधी मिळाली. या ठिकाणी भाजपाने काँग्रेसची साथ घेतली. भडगाव मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन सभापतीपदी शिवसेनला तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीला संधी मिळाली. पाचो:यात भाजपाने  सेनेला तर भडगावात सेनेने भाजपाला दूर ठेवत विरोधकांशी युती केली.चाळीसगाव : पंचायत  समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या स्मितल दिनेश बोरसे व उपसभापती म्हणून भाजपाचे संजय भास्कर पाटील हे प्रत्येकी सात  मते मिळवत विजयी झालेत. राष्ट्रवादीच्या  सुनीता जिभाऊ पाटील यांनी दोन्ही निवडणूक प्रक्रियेत तटस्थ राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना सहा मते मिळाली. 14 रोजी पं.स. कार्यालयात सभापतीपदासाठी स्मितल दिनेश बोरसे (भाजपा), लता बाजीराव दौंड व सुनीता जिभाऊ पाटील (दोघे राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी तर उपसभापतीपदासाठी संजय भास्कर पाटील (भाजपा) तसेच लता बाजीराव दौंड व  सुनीता जिभाऊ पाटील (दोघे राकाँ) यांनी उमेदवारी अर्ज भरला.. आणि राष्ट्रवादीचा एक अर्ज अवैधदुपारी तीन वाजेनंतर निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रारंभी सभापतीपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता पाटील यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रासह स्वत:चे नाव नमूद नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. उर्वरित दोघा अर्जावर  मतदान प्रक्रिया सुरु झाली.सुरुवातीला सभापतीपदासाठी लता बाजीराव दौंड यांचे नाव पुकारले. त्यावेळी मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा सदस्यांनी हात उंचावून त्यांना मतदान केले. राकाँच्या सुनीता पाटील यांनी मात्र नाराजीमुळे हाताची घडी घालून तटस्थाची भूमिका घेतली व मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही म्हणून स्मितल बोरसे यांची सभापतीपदी निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.उपसभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेत राकाँच्या लता दौंड यांचे उमेदवारी अर्जावरील प्रतिज्ञापत्रावर नाव नसल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला. त्यामुळे  दोघा उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला भाजपाचे संजय भास्कर पाटील यांचे नाव पुकारल्यावर भाजपाच्या 7 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले तर राकाँच्या सुनीता पाटील यांना सहा सदस्यांनी मतदान केले. स्वत: उमेदवार असूनही नाराज सुनीता पाटील यांनी मतदान न करता तटस्थ राहिल्या. त्यामुळे संजय पाटील यांना उपसभापती म्हणून  घोषणा करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी  शरद पवार होते. यावेळी पोनि आदिनाथ बुधवंत, सपोनि सुरेश शिरसाठ, गटविकास अधिकारी मधुकर वाघ उपस्थित होते.समसमान असूनही गरज राहिली नाही ईश्वर चिठ्ठीचीसुनीता पाटील या दोन्ही निवडणुकीत तटस्थ राहिल्याने ईश्वरचिठ्ठीची गरज भासली नाही, त्यामुळे समसमान मते असूनही केवळ राष्ट्रवादीतील नाराजीमुळे भाजपाला यश मिळाल्याने राजकीय गोटात चर्चेचा विषय झाला आहे. न.पा.च्या स्वीकृत सदस्य निवडीत फसगत झाल्यावर नंतर पुन्हा पं.स. सभापती-उपसभापती निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यात झालेली चूकही राष्ट्रवादीच्या अंगाशी आली असून    राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा चुका घडतातच कशा ? असा प्रश्न यावेळी अनेकांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणारसभापतीपदासाठी लता दौंड व उपसभापतीसाठी सुनीता पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली होती. दोन्ही पदासाठी इतर डमी अर्ज होते. पाटील यांचा अर्ज प्रतिज्ञापत्राच्या निमित्ताने रद्द केला गेला. या मागे  दबावतंत्र वापरले गेले आहे. चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केला असून  याबाबत निवडणूक अधिका:यांच्या निर्णयाविरुध्द न्यायालयात दाद मागणार आहे. अर्ज बाद झाल्याने सुनीता पाटील यांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही. असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी सांगितले.