शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव नगर पालिकेत ‘सभापती’ निवडीला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 19:23 IST

सदस्य संख्येबाबत एकमत न झाल्याने जिल्हाधिकारी देणार निर्णय

ठळक मुद्देसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समितीमधील सदस्य संख्येबाबत झाले नाही एकमतसभापती निवडीविनाच संपली सभापुढील निर्णयासाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविला प्रस्ताव

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि. ५ : चाळीसगाव नगर पालिकेच्या पाच विषय समितींच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पिठासीन अधिकारी तहसीलदार कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलविण्यात आली होती. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समितीमधील सदस्य संख्येबाबत एकमत न झाल्याने पुढील निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे. सभापती निवडीविनाच दुपारी दोन वाजता सभा संपली.नगरपालिकेतील बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण अशा पाच विषय समितीच्या सभापतींची एक वर्षीय मुदत जानेवारीत पुर्ण होत असल्याने शुक्रवारी निवडीची सभा बोलवण्यात आली होती.नगरपालिकेत भाजपाची अपक्ष व शिवसेना सदस्यांच्या पाठिंब्यावर सत्ता असून विरोधी शहर विकास आघाडीचे १७ सदस्य आहेत. शविआने विषय समित्यांमध्ये प्रत्येकी आठ ते दहा सदस्य असावे असा आग्रह धरला होता. तर सत्ताधारी गट यात ११ सदस्य असावे. यासाठी आग्रही होता. सदस्य संख्येबाबत दोन्ही गटात एकमत न झाल्याने याबाबत जिल्हाधिकाºयांकडे पुढील निर्णयासाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय पिठासीन अधिकाºयांनी घेतला. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशा चव्हाण, शविआ गटनेते राजीव देशमुख, भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, घृष्णेश्वर पाटील, आनंदा कोळी, शामलाल कुमावत यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव