शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

चाळीसगाव ‘महानगरी,’ तर पाचोऱ्यात ‘सचखंड’ला थांबा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:35 IST

चाळीसगाव व पाचोरा येथील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पाचोरा येथे सचखंड, तर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर महानगरीला थांबा देण्यात रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमीप्रवाशांची होणार मोठी सोयजळगावलाही थांबा मिळण्यासाठी केलीय मागणी

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव व पाचोरा येथील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पाचोरा येथे सचखंड, तर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर महानगरीला थांबा देण्यात रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. महिनानाअखेर दोन्ही गाड्या थांबायला लागतील, असे खासदार ए.टी.पाटील यांनी सांगितले. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.चाळीसगाव व पाचोरा रेल्व स्थानकावर गेल्या दोन-तीन वर्षात अनेक महत्वाच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांंना थांबे मिळाले आहे. आता त्यात आणखी भर पडली असून, आता पाचोरा रेल्वे स्टेशनला सचखंड एक्सप्रेस चा तर चाळीसगाव ला महानगरी चा थांबा मिळणार आहे. खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन प्रवांशाची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या गाड्यांना थांबा देण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे विभागाने या गाड्यांच्या थांब्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. दोन्ही गाड्यांना महिनाअखेरपर्यंत थांबा मिळणार आहे. दरम्यान, दोन्ही तालुक्यातील रेल्वे प्रवाशी संघटनाची या गाड्याना थांबा मिळण्याची मागणी होती.'राजधानी'ला जळगाव थांबा?नव्याने सुरू होणाºया मुंबई ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसला जळगावला थांबा मिळण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागणीनुसार राजधानी एक्सप्रेसला जळगाव थांब्याला हिरवा झेंडा मिळवण्याची चिन्हे आहेत. राजधानी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला थांबा मिळण्याचे संकेत आहे. त्यामुळे दिल्लीला व उत्तर भारतात जाणे सोयीचे होणार आहे.प्रवाशांच्या मागणीनुसार चाळीसगावला महानगरी व पाचोरा ला सचखंड एक्सप्रेसचा थांबा रेल्वे विभागाने मान्य केला आहे. याचे मोठे समाधान आहे. तर नव्याने सुरू होणाºया राजधानी एक्स्प्रेसला ही जळगाव येथे थांब्याची मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.-ए.टी.पाटील खासदार

टॅग्स :railwayरेल्वेChalisgaonचाळीसगाव