शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

चाळीसगावी ६० जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 17:58 IST

चाळीसगाव : मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त रविवारी समाजिक उपक्रम राबविण्यात आले. राजपूत मंगल कार्यालयात आयोजित ...

ठळक मुद्देमहाराणा प्रताप जयंतीप्रतिमापूजन, तलवारबाजीचे सादरीकरण

चाळीसगाव : मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त रविवारी समाजिक उपक्रम राबविण्यात आले. राजपूत मंगल कार्यालयात आयोजित सोहळ्यात  आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रतिमा पूजन झाले. रक्तदान शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. तलवारबाजीचे सादरीकरणही केले गेले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळून जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास अडचणी येत आहे. यावर उपाय म्हणून महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यावेळी ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. गरजूंना अन्नदान करण्यात आले. सकाळी नऊ वाजता वाजता पाटीलवाडास्थित  जय बजरंग व्यायाम शाळेत माजी उपनगराध्यक्ष शिवाजी राजपूत यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उदघाटन चंपाबाई रामरतन कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत यांच्यासह जि.प.चे माजी सदस्य मंगेश पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी पं.स.चे भाजपा गटनेते संजय पाटील, न.पा.चे भाजप गटनेते  संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सविता राजपूत, माजी नगरसेवक महेंद्र चंद्रसिंग पाटील,  नानाभाऊ पवार, भाऊसाहेब जगताप, नितीन पाटील, सुचित्रा पाटील,निलेश राजपूत, प्रदीप राजपूत, दीपक परदेशी सुनील राजपूत आदी उपस्थित होते. ठाणसिंग पाटील, अरुणसिंग पाटील प्रवीण ठोके यांच्यासह जीवन सुरभी ब्लड बँकेचे डॉ. दत्ता भदाणे व त्यांची टीम, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती, राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकारी, महाराणा प्रताप मित्रमंडळ पाटीलवाडा, महाराणा प्रताप मित्रमंडळ जुने विमानतळ, महाराणा प्रताप मित्रमंडळ आदर्शनगर, राहुल पॉइंट जिद्दी ग्रुप, वैष्णव मित्रमंडळ, सिद्धिविनायक मंडळ धुळे रोड, यांनी सहकार्य केले.  महाराणा प्रताप शौर्याचे प्रतिक - आ. चव्हाणमेवाड नरेश महाराणा प्रताप हे शौर्याचे प्रतिक असून, काळाच्या पटलावर ही अमीट मुद्रा उमटलेली आहे. त्यांनी आपल्या मातीवर मनापासून प्रेम करतांना समाजातील प्रत्येक घटकासाठी राज्य उभे केले. त्यांच्या शौर्याची मशाल अखंड तेवत राहील. असे प्रतिपादन आ. मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले. 

यावेळी दिव्येश जयदीप गांगुर्डे याबालकाने चित्तथरारक तलवारबाजीचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. त्यांच्या चापल्याने उपस्थित भारावले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव