शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:13 IST

मालक व चालकाविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव : महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले सात ट्रॅक्टर जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव येथील पोलीस कवायत मैदानातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती अशी की, २५ जानेवारी २०१९ रोजी अवैध गौणखनिज पथकातील तलाठी पी.एम. महाजन व तलाठी दिनेश यडे यांनी टाकळी प्र.चा. येथे हसतखेळत या हॉटेलसमोर रात्री साडेआठच्या सुमारास वाळूने भरलेले ट्रॅक्टर टाकळी प्र.चा.कडून चाळीसगावकडे येत असताना पकडले. पथक ट्रॅक्टर चालकाची विचारपूस करीत असताना चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. पथकाने पाठलाग करूनही चालक सापडला नाही. त्यामुळे जप्त केलेले विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर व ट्रॉली व त्यातील एक ब्रास वाळू पोलीस कवायत मैदानावर आणले.मात्र हे ट्रॅक्टर १३ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महसूल विभागाचे कर्मचारी भागवत आनंदा चव्हाण हे पाहण्यासाठी गेले असता सदर ट्रॅक्टर जागेवर आढळून आले नाही. हे ट्रॅक्टर १२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस कवायत मैदानावर होते. मात्र १३ रोजी सकाळी वाळूने भरलेले ट्रॅक्टर गायब झाल्याचे आढळून आले. हे ट्रॅक्टर व ट्राली पळवून नेल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक (नाव गाव समजू शकले नाही) व मालक नितीन महाजन यांच्याविरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.काही दिवसांपासून तालुक्यात वाळू चोरीचे प्रकरण चांगलेच गाजत असताना आता चक्क पोलीस कवायत मैदानातून वाळू चोरीप्रकरणी पकडण्यात आलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव