शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौरांच्या नातेवाईकांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:48 IST

तीन जण जखमी : जळगावातील भोईटे गढीजवळील घटना, आरोपी फरार

ठळक मुद्देचाकु, लोखंडी पट्टीने केले वार

जळगाव : आईसक्रीम घेण्यासाठी जात असलेल्या तीन तरुणांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना जुने जळगावात गुरुवारी रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात पळापळ सुरू झाली होती. काही वेळातच शनिपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले होते. हे तीनही जण माजी महापौर ललित कोल्हे यांचे नातेवाईक आहेत.चेतन युवराज कोल्हे, युवराज यशवंत कोल्हे, सुजय एकनाथ कोल्हे (रा. कोल्हेवाडा, जुने जळगाव) अशी या जखमींची नावे आहेत.शहरातील रामपेठ कोल्हेवाडा येथील सौरभ प्रशांत कोल्हे याने गुरुवारी रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास चेतन, युवराज व सुजय कोल्हे यांना आईसक्रीम घेण्यासाठी पाठविले. त्यासाठी तिघे जण हेमराज कोल्हे याची दुचाकी घेवून आईसक्रीम घेण्यासाठी गेले. कुत्रे मागे लागतात म्हणून त्यांनी हातात प्लास्टिकचा पाईप घेतला होता.चाकु, लोखंडी पट्टीने केले वारत्याचवेळी भोईटे गढीजवळ आकाश उर्फ धडकन सुरेश कोळी, सागर उर्फ झंप्प्या आनंदा कोळी व विशाल बुनकर हे रस्त्यावर उभे होते. त्यांनी चेतनला हातात काठी घेवून फिरताहेत, तुम्ही दादा झाले ? का म्हटले. त्यावर चेतनने कुत्र्याच्या भितीने नळी घेतल्याचे सांगितल्यावरही आकाशने चेतनला लोखंडी पट्टी मारली तर विशाल बुनकर याने चेतनची पाठ व मनगटावर दगड मारुन जखमी केले. हा प्रकार पाहून भांडण सोडविण्यासाठी चेतनच्या सोबत असलेले युवराज व सुजय गेले असता त्यांना सागर उर्फ झंप्प्या कोळी याने दोघांना चाकू मारला.या प्रकरणात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी फरार असल्याचे शनिपेठ पोलिसांनी सांगितले.परिसरात दहशत : अचानक झालेल्या प्रकाराने परिसरात एकच पळापळ सुरू झाली. काही जणांनी तात्काळ शनिपेठ पोलिस स्टेशनला घटनेची माहिती कळविली. काही वेळातच शनिपेठ पोलीस या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सौरभ प्रशांत कोल्हे रा. रामपेठ कोळीवाड याच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात आकाश उर्फ धडकन सुरेश कोळी, सागर उर्फ झंप्प्या आनंदा कोळी व विशाल बुनकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे हे स्वत: करीत आहेत. पोलीस निरिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ तसेच सामान्य रूग्णालयातही जाऊन हल्ल्याच्या घटनेची माहिती घेतली.आरोपींवर कारवाईची मागणी : हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी माजी महापौर ललीत कोल्हे यांनाा घटनेची माहिती कळविली. कोल्हे यांनी गुरुवारी दुपारी पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांची भेट घेतली व संशयितांना तत्काळ अटक करुन कारवाईची मागणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी