शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी परिषद निवडणुकांमुळे चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 13:25 IST

विद्यार्थी परिषद खुल्या निवडणुका आॅगस्ट महिन्यात होत आहेत

शैक्षणिक वर्ष २०१९-२० यापासून महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद खुल्या निवडणुका आॅगस्ट महिन्यात होत आहेत. लोकशाहीचे बाळकडू महाविद्यालयीन जीवनापासून मिळावे, ते वाढावे आणि फलद्रुप व्हावे हा त्यामागील उद्देश १९९४ पासून बंद असणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका २५ वर्षानंतर सुरू होत आहेत. विद्यार्थी वर्गात यामुळे उत्साह आणि चैतन्य आहे. लोकशाहीचे बिजारोपण होण्यासाठी निवडणुका निश्चित महत्वाच्या आहेत. शासनाने त्यासाठी उचलेले पाऊल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. महाविद्यालय विद्यार्थी परिषद व विद्यापीठ कॅम्पस विद्यार्थी परिषद हा पहिला टप्पा असणार आहे. या टप्प्यात अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व मागासवर्गीय प्रतिनिधी असे चार आणि वर्ग प्रतिनिधी असे एकूण ५ मते देण्याचा अधिकार मतदार विद्यार्थ्याला असेल. पहिले चार निवडलेले प्रतिनिधीची सर्व महाविद्यालयांची मतदार यांनी विद्यापीठ स्तरावर तयार होऊन त्यातून अध्यक्ष,सचिव, महिला प्रतिनिधी व मागासवर्गीय प्रतिनिधी यांची निवडणूक घेऊन विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठीत होईल. निवडणूक लढविण्यासाठी पात्रता - पूर्णवेळ नियमित विद्यार्थी असावा, संपूर्ण विषय उत्तीर्ण असावा, एटीकेटी नसावी, एकाच वर्गात पुन:प्रवेश नसावा, वयाच्या २५ वर्ष (कमाल वयोगमर्यादा). आचारसंहिता- पॅनल तयार करता येणार नाही, धर्म, जात, संघटना व कोणत्याही व्यक्तीचे चिन्ह, प्रतिमा, छायाचित्र वापरता येणार नाही. वर्ग प्रतिनिधीसाठी १०० रु. व अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रतिनिधीसाठी ५००० रुपये एवढा खर्च असेल.- प्रा.सत्यजित साळवे, संचालक, विद्यार्थी विकास.

टॅग्स :Jalgaonजळगाव