केंद्रीय पथकाकडून होणार जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथील सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 03:00 PM2020-05-16T15:00:17+5:302020-05-16T15:00:32+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथे केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Central team will conduct survey at Goradkheda in Jamner taluka | केंद्रीय पथकाकडून होणार जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथील सर्वेक्षण

केंद्रीय पथकाकडून होणार जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथील सर्वेक्षण

Next

जामनेर, जि.जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथे केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण केंद्रीय पथकाकडून करण्यात येणार आहे. १८ ते २२ मे दरम्यान केंद्रीय टीम जळगाव जिल्ह्यात दाखल होतील.
देशात विषाणू तपासणी व संशोधनाचे कार्य करणाऱ्या पुणे येथील इंंिडयन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च ही संस्था सदर सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात रॅपिड टेस्टसुद्धा करण्यात येणार आहे. येथून सॅम्पल पुणे येथील नॅशनल व्हायरॉलॉजी लॅबला पाठवण्यात येणार असून, नंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावरून २० गाड्या, आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग, पी.पी.ई. किट व आवश्यक साधन सामग्री सदर टीमला पुरवण्यात येणार आहे.
तहसीलदारांकडून पुरेसे पोलीस संरक्षण,आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी पुरवण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सदर दिवशी सर्वेक्षणाच्या गावात उपस्थित राहणार आहे. या गावासाठी रवींद्र सूर्यवंशी यांनी पथक प्रमुख म्हणून तालुकास्तरावरून नेमणूक करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका स्तरीय टीमने सदर गावाला भेट देऊन सर्वेक्षणाबाबत नागरिकांचे समुपदेशन केले व कोरोना आजार ब प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या टीममध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मनोज तेली, बशीर पिंजारी, एस.पी.नागरगोजे, सुशीला चौधरी, बी.के.साळुंके, एम.एस.परदेशी गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीसांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Central team will conduct survey at Goradkheda in Jamner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.