शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना केंद्राने तात्काळ परत बोलवावे: पटोले

By निलेश जोशी | Updated: November 20, 2022 12:32 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही.

जळगाव जामोद:

छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात अवाजवी व वादग्रस्त वक्तव्य करणाºया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्राने तात्काळ परत बोलवावे, अशी मागणी आपण केंद्राकडे करणार आहोत. सोबतच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपने या प्रश्नी महाराष्ट्राची माफी मागावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी जयराम रमेश, एच.के पाटील, बाळासाहेब थोरात, अतुल लोंढे यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. भाजपला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. एक प्रकारे वैचारिक सफाई करण्याचा प्रकार भाजपकडून केला जात असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे इंग्रजांकडून सावरकर ६० रुपयांची पेन्शन  घेत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांनी यापूर्वीही वारंवार वादग्रस्त व्यक्तव्य केली आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विषयी देखील त्यांनी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे तोल सुटलेल्या राज्यपालांना केंद्राने त्वरीत माघारी बोलवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपतींचा इतिहास कलुषीत करण्याचे भाजपचे मनसुबे!छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याची घोषणा करणारी भाजप आज शिवाजी महाराजासंदर्भातच सुधांशू त्रिवेदीच्या माध्यमातून अपशब्द वापरत आहे. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच ते आता समुद्रात बुडवायला निघाले आहेत. त्यामुळे प्रकरणी भाजपने माफी न मागितल्यास भाजपवाल्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, असा रोकठोक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले