मनोज जोशीपहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान झाले असून, लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असल्याने संतप्त भावना शेतकºयांंमध्ये व्यक्त होत आहे.देवळी व गोगडी नदीवर धरणे असून, सततच्या पावसाने धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे दोन्ही नद्यांचा संगम असल्याने याचे प्रवाहित पाणी गोगडी नदीच्या पात्रात येते. सांगवी गावाच्या पुढे या नदीवर लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तर अंतर्गत सिमेंटचा साठवण बंधारा घातला आहे. पण दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंती नाही. पाण्याच्या प्रवाहाला वाट न मिळाल्याने बंधाºयाला भगदाड पडून शेतातून पाणी वाहत आहे. डॉ.जितेंद्र सुधाकर घोंगडे व विजय केशव घोंगडे या शेतकºयांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच ठिकाणी सरंपच ज्योती शंकर घोंगडे, माजी सभापती बाबूराव घोंगडे यांची शेती आहे. तरीही बंधाºयाचे काम रखडले आहे.याच नदीवर दुसºया ठिकाणी अशाच पद्धतीने माजी सरपंच देवकाबाई रामकृष्ण बनकर यांच्या शेताजवळील साठवण बंधाºयाला भगदाड पडल्याने शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या लालफितीचा फटका शेतकºयांना बसत असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त १९ जून २०१५ प्रकाशित केले आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षाचा शेतकºयांना फटका२०१५ मध्ये, नंतर मध्ये एकदा व यावर्षी झालेल्या पावसाने बंधाºयाला भगदाड पडण्याची तिसरी वेळ आहे. या बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लघुपाटबंधारे जलसिंचन विभाग कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून दुरूस्तीची मागणी केली आहे, तर यामुळे होणाºया नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील, अशा आशयाच्या तक्रारी दिल्या आहेत. ‘लोकमत’नेही सत्यता समोर आणली आहे. तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘जलयुक्त’चा निधी परत२०१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलयुक्त शिवाराची कामे करण्यासाठी शासनातर्फे जिल्ह्यात आलेल्या २५ कोटी निधीपैकी ११ कोटी ७६ लाख निधी कामांवर खर्च न करता परत गेला आहे.या बंधाºयासंदर्भात लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे तत्कालीन अभियंता विसावे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मंजुरीचे आश्वासन दिले होते. पण बंधारा दुरूस्तीचे काम दुर्लक्षित आहे. स्वखर्चाने येथील शेतकºयांनी याची दुरुस्ती केली आहे. पण या पावसाने पुन्हा बंधाºयाला भगदाड पडले आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालावे.-बाबूराव केशव घोंगडे,माजी सभापती, पंचायत समिती सभापती, जामनेर
जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:45 IST
सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात झाले आहे.
जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड
ठळक मुद्देलघू पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाचा कारभार चव्हाट्यावरप्रशासनाच्या दुर्लक्षाचा शेतकºयांना फटका‘जलयुक्त’चा निधी परत