जळगाव : बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. गायिका प्रमिला दातार यांनी 'अरे संसार संसार...’ हे गीत ऑनलाईन सादर केले. यावेळी साहित्यिक ज्ञानेश्वर शेंडे, विजय जैन, किशोर कुळकर्णी, अशोक चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या स्थापनेमागील डॉ. भवरलाल जैन यांची भूमिका साहित्यिक ज्ञानेश्वर शेंडे यांनी विषद केली. ठाणे येथील बहिणाबाई चौधरी साहित्याच्या अभ्यासक मनिषा कोल्हे यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी, नातसून पद्माबाई चौधरी, पणतीसून स्मिता चौधरी, शोभाबाई चौधरी, वैशाली चौधरी, हितेंद्र चौधरी, कैलास चौधरी, सविता चौधरी उपस्थित होते. बहिणाबाईंच्या नातेवाईकांसह अशोक चौधरी, देवेश चौधरी, देवेंद्र पाटील, तुषार हरिमकर यांनी सहकार्य केले.