शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

दुग्धालयाचे कुलूप तोडून रोकड लांबवली, अर्धे शटर उघडून चोरी 

By विजय.सैतवाल | Updated: July 1, 2024 00:33 IST

जिल्हा पेठ परिसरातील कांताई सभागृहासमोर असलेले दत्त दुग्धालय हे दुकान रात्री बंद करून दुकानमालक अमित चौधरी हे घरी निघून गेले. पहाटे चार ते सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरट्याने एका शटरचे कुलूप तोडून अर्धे शटर उघडून आत प्रवेश केला अन्...

जळगाव : जिल्हापेठ परिसरात असलेल्या दत्त दुग्धालय या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातून आठ हजार रुपयांची रोकड लांबविली. ही घटना रविवारी (३० जून) पहाटे चार ते सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली. सकाळी दुकान उघडायला आले त्या वेळी ही चोरी लक्षात आली.जिल्हा पेठ परिसरातील कांताई सभागृहासमोर असलेले दत्त दुग्धालय हे दुकान रात्री बंद करून दुकानमालक अमित चौधरी हे घरी निघून गेले. पहाटे चार ते सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरट्याने एका शटरचे कुलूप तोडून अर्धे शटर उघडून आत प्रवेश केला. गल्ल्यात असलेल्या काही नोटा व चिल्लर अशी एकूण जवळपास आठ हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेल्याची माहिती अमित चौधरी यांनी दिली.सकाळी चौधरी यांच्या आई दुकान उघडण्यासाठी आल्या त्या वेळी कुलूप तुटलेले व शटर अर्धे उघडे दिसले. त्या वेळी त्यांनी घरातील सदस्यांना माहिती दिली. त्यांनी हे शटर न उघडता तसेच राहू दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. दोन कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली.

चोरटा सीसीटीव्हीत कैददुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटा कैद झाला आहे. त्याने फ्रीजमध्ये लस्सी, रबडीदेखील पाहिली. मात्र कोणताही खाद्य पदार्थ न खाता व न चोरता त्याने गल्ल्यातून रोकड लांबविल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.

टॅग्स :RobberyचोरीThiefचोरPoliceपोलिस