शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

घर खरेदीसाठी जमवलेली तीन लाखांची रोकड खाक

By admin | Updated: April 18, 2017 00:33 IST

रिंगणगाव येथे घरास आग : शेतक:यावर आपत्ती, कुटुंब उघडय़ावर, तरुणांनी जीव धोक्यात घालून विझवली आग

रिंगणगाव, ता.एरंडोल : येथे एका शेतक:याच्या घरास अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्यासोबत घर खरेदीसाठी जमविलेले 2 लाख 75 हजार व  कापूस विक्रीतून आलेले 30 हजार असे एकूण 3 लाख रु. जळून खाक झाले. ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजता घडली. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आणि आग आटोक्यात आणली.रिंगणगाव येथील बाबूलाल हिरामण बाविस्कर यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ते शेती करून आपला चरितार्थ चालवितात. शेतीचे उत्पन्न आणि वडिलांकडून घर खरेदीसाठी उसने घेतलेले पावणेतीन लाख रु. व संसारोपयोगी साहित्य यांची या आगीत जळून राखरांगोळी झाली आहे. हा परिवार पूर्णपणे उघडय़ावर आला आहे.बाविस्कर हे कोळीवाडय़ात आपल्या कुटुंबासह राहतात. उन्हाळ्याचे दिवस  असल्याने आज सकाळी ते   लवकर शेतात निघून गेले. मात्र त्यांच्या बंद घरातून अचानक धुराचे लोट निघू लागल्याने आणि घरात आग लागल्याचे दिसल्याने शेजारी राहणा:या महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली.  मिळेल त्या साधनाने आणि मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, गावात लगAकार्य असल्यामुळे तिथे उभा असलेला पाण्याचा टँकर लगेच तरुणांनी घटनास्थळी आणला व पाणी मारण्यास सुरुवात केली. घटनेचे वृत्त कळताच तलाठी पानपाटील यांनी अगिAशमन दलास कळविले आणि अवघ्या 20 मिनिटात एरंडोल, जळगावचे अगिAशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. घरास आग लागल्याचे समजताच बाविस्कर कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. तोर्पयत तरुणांनी धाब्यावर चढून टीकाव, पावडय़ाने माती टाकण्याचे काम सुरू केले होते. अगिAशमन बंब गावात आला पण विजेच्या तारा ह्या गल्लीत खूप खाली असल्याने वीज प्रवाह उतरण्याचा धोका होता. त्यामुळे  वीज प्रवाह  उपकेंद्रावरून लगेच बंद करण्यात आला आणि अगिAशमन दलाच्या जवानाने निमुळत्या गल्लीतून गाडी पास करून घटनास्थळ गाठत आग आटोक्यात आणली. जैन इरिगेशन कंपनीचा दुसरा अगिAशमन बंबदेखील गावात दाखल झाला होता. मात्र तोर्पयत आग आटोक्यात आणली गेली.आगीचे वृत्त समजताच सर्व गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली व आपापल्या परिने आग विझविण्याचे प्रयत्न केले. या वेळी बाबूलाल बाविस्कर यांनी घरातून पैशांचा डबा काढून आणला. मात्र त्यात ठेवलेल्या 500, 100, 2000 रु. च्या नोटा जळून खाक झाल्या होत्या. तर काही अर्धवट जळालेल्या  होत्या. हे पाहून बाविस्कर कुटुंबीयांनी आक्रोश केला. या वेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. घटनास्थळी नायब तहसीलदार आबा महाजन, वरिष्ठ लिपिक  हरणे, तलाठी पानपाटील, पोलीस पाटील वासुदेव मोरे, ग्रामसेवक सतीश सूर्यवंशी व ग्रा.पं. पदाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. आगीत विष्णू विश्राम बाविस्कर व बापू बाविस्कर यांचीही घरे जळून नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा करण्यात आला असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला                 आहे.                                                जीव धोक्यात घालून काढली गॅस हंडी घरातून धुराचे लोट निघत असल्याचे समजताच दरवाजा तोडण्यात आला. मात्र घरात धुराच्या साम्राज्यामुळे काहीच दिसत नव्हते. काही तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून गॅस हंडी उचलून अंगणात आणली व त्यावर पाण्याचा मारा सुरू केला. या  गॅस हंडीने पेट घेतला असता तर  स्फोट होऊन अनर्थ होण्याची शक्यता होती. पण सुदैवाने ते टळले.