शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:34 IST

अवैधरित्या वाळू वाहतूक पकडले होते ट्रॅक्टर

जळगाव : तहसील कार्यालयातून पळवून नेलेले वाळूचे ट्रॅक्टर मोहाडी येथे एका राजकीय पुढाऱ्याच्या घरासमोर उभे असल्याचे आढळून आले आहे. ट्रॅक्टर मालकानेच हे ट्रॅक्टर पळवून नेल्याचे समोर आले आहे.अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर दंड वसुलीसाठी तहसील कार्यालयात उभे केलेले होते. ट्रॅक्टर मालकाने हे ट्रॅक्टर परस्पर पळवून नेल्याची घटना बुधवारी समोर आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरविषयी तहसीलदार वैशाली हिंगे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह ४ एप्रिल रोजी मोहाडी येथे जाऊन हे ट्रॅक्टर जप्त केले होते. चालक रुपचंद गुलचंद साळुंखे (३३, रा. मोहाडी) याच्या ताब्यातील हे ट्रॅक्टर (क्र. एम.एच-१९ सी ३२७७) हे दंडवसुलीच्या कारवाईसाठी तहसील कार्यालयात उभे केले होते. चौकशीत सतीष संजय उर्फ ईश्वर कोळी (सोनवणे) रा. मोहाडी हे ट्रॅक्टरचे मालक असल्याचे समोर आले होते.७ एप्रिलपर्यंत हे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे होते. ८ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तहसीलदार वैशाली हिंगे या कार्यालयात आल्या असता ट्रॅक्टर जागेवर दिसले नाही. तसेच गेटचे कुलूपही उघडे दिसले. त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारपूस तसेच चौकशी केली. तसेच इतरत्र शोध घेतला असता वाळूसहीत ट्रॅक्टर मालक सतीष कोळी यांनी परस्पर पळवून नेल्याचे समजले होते.ट्रॅक्टर पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर तहसीलदार हिंगे यांच्या आदेशानुसार पिंप्राळा येथील मंडळाधिकारी रवींद्र उगले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर व ३ हजार ४९२ रुपयांची १ ब्रॉस वाळू असा एकूण २ लाख ५३ हजार ४९२ रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी शहर पोलिसात ट्रॅक्टर सतीष कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दंड न भरता कार्यालयाचे कुलूप तोडून वाळूने भरलेले ट्रॅक्टर मालक सतीष कोळी यांनी पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.हे पळवून नेलेले ट्रॅक्टर मोहाडी येथील एका बड्या राजकीय पुढाºयाच्या दारासमोर उभे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाळू व्यवसायात राजकीय भागीदारी तर नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव