शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस किलोचे ओझे घेऊन ध्येयवेडा तरूण ५० किमीपर्यंत धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:32 IST

ऐकावे ते नवलच....: साडेनऊ तासात केली मोहीम पूर्ण

शिरसोली : शिरसोली येथून सकाळी पाठीवर २५ किलोचे वजन घेऊन जळगाव ते पाचोरा हे अंतर पन्नास किलोमीटर पळत गाठायचे, या ध्येयाने पछाडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी शिरसोलीमध्ये एकच गर्दी झाली. त्याने हे अंतर अवघ्या साडेनऊ तासात पूर्ण केले.आपले ध्येय कोणतेही असो, ते गाठण्यासाठी चिकाटी अन् जिद्द आवश्यक असते. याचा प्रत्यय शिरसोलीकरांना रविवारी आला. जळगाव ते पाचोरा पन्नास किलोमीटरचे अंतर पाठीवर २५ किलो वजन घेऊन धावण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या एका युवकाची. राहुल पाटील असे या युवकाचे नाव. वय अवघे २४ वर्षे! जळगाव येथील एका जिममध्ये तो प्रशिक्षक म्हणून काम करतो. त्याने जळगाव येथील डी. एस. पी. चौकापासून ते पाचोरा हे पन्नास किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सकाळी सात वाजता सुरुवात केली. सायंकाळी साडेचार वाजता तो पाचोरा येथे पोहचला.यावेळी रस्त्यात वडली ते सामनेर या आठ किमी अंतरात पाऊसही सुरु होता. तरीदेखील त्याने पळणे थांबविले नाही. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी त्याचे स्वागत करून त्याचा उत्साह वाढविला. मित्र रुपेश परदेशी, राहुल पाटील व राकेश आहिरे यांनी त्याला मदत केली.आर्मीचे जवान पाठीवर ५० किलोचे वजन घेवून डोंगर पठारावर धावू शकतात तर आपण का नाही पंचवीस किलोचे वजन घेवून ५० किमीचे अंतर पळू शकत? यासाठी मी ५० किलोमीटर पळण्याचा चंग बांधला आणि ग्रामस्थ व मित्रांच्या मदतीने हे अंतर सात तासात पूर्ण केले.-राहुल पाटील

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव