शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर असताना वाहकाला हृदयविकाराचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:15 IST

जळगाव : जळगाव आगारातून अंजनविहिरे येथे रात्री मुक्कामासाठी गेलेल्या बसवरील वाहकाला शुक्रवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची घटना झाली. ...

जळगाव : जळगाव आगारातून अंजनविहिरे येथे रात्री मुक्कामासाठी गेलेल्या बसवरील वाहकाला शुक्रवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची घटना झाली. बसवरील चालकाने तत्काळ त्यांना जळगावला हलविले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. बळीराम विठ्ठल सावंत असे या मयत वाहकाचे नाव आहे.

जळगाव आगाराचे व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी माहिती दिली. ब‌ळीराम सावंत हे वाहक जळगाव आगारात कार्यरत होते. शुक्रवारी रात्री त्यांच्याकडे धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे या गावात मुक्कामाला बस नेण्याची जबाबदारी होती. त्यानुसार वाहक सावंत व चालक झेंडू सोनवणे यांनी जळगाव आगारातून सायंकाळी अंजनविहिरे या ठिकाणी मुक्कामी बस नेली. या ठिकाणी सावंत यांना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अचानक छातीत दुखायला लागले. यावेळी चालक झेंडू सोनवणे यांनी तात्काळ गावातील खासगी डॉक्टरांना उपचारासाठी बोलविले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून, सावंत यांना पुढील उपचारासाठी जळगावला नेण्याचे सांगितले. त्यानुसार सोनवणे यांनी तत्काळ सावंत यांना बसने जळगावला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सावंत यांना मयत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, सकाळी आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, कामगार अधिकारी प्रशांत महाजन व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी महामंडळाच्या नियमानुसार प्रज्ञेश बोरसे यांनी आर्थिक मदत म्हणून तत्काळ ५ हजार रुपये सावंत यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केले. तर नियमानुसार इतरही मदत महामंडळातर्फे देण्यात येणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले.