शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरानजीक बसवर आदळताच कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:02 IST

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि १८ : वळण घेत असताना बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेली कार बसवर आदळली व त्यात कारने लगेच पेट घेतला. दरम्यान, या अपघातात कारचची एअर बॅग उघडल्याने कारमधील प्रवाशांचा जीव वाचला. ही थरारक घटना शनिवारी रात्री १० वाजता बांभोरी येथे महामार्गावर घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी ...

ठळक मुद्देमहामार्गावर ‘द बर्निंग कार’ चा थरार बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने झाला अपघात एअरबॅगमुळे वाचले प्राण

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि १८ : वळण घेत असताना बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेली कार बसवर आदळली व त्यात कारने लगेच पेट घेतला. दरम्यान, या अपघातात कारचची एअर बॅग उघडल्याने कारमधील प्रवाशांचा जीव वाचला. ही थरारक घटना शनिवारी रात्री १० वाजता बांभोरी येथे महामार्गावर घडली.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  गुजरात राज्यातील नवसारी येथील शांताराम मन्साराम पाटील हे रविवारी जळगाव शहरात नातेवाईकाकडे लग्न असल्यानेपत्नी व चालक संजय भिकाजी गाढे यांच्यासह कारने (क्र.जी.जे.२१.बी.सी.५०३२) शनिवारी दुपारी नवसारी येथून निघाले होते. रात्री त दहा वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून जळगाव शहराकडे जात असताना कढोली रस्त्याकडून बांभोरी गावाकडे जैन कंपनीची बस (एम.एच.१९.वाय.१६४५) ही वळण घेत होती. बसवरील चालकाने अचानक ब्रेक दाबला, त्यामुळा बस जागेवरच थांबल्यामुळे विद्यापीठाकडून येत असलेली पाटील यांची कार बसवर धडकली.

अन् कारमधील लोकांनी काढला पळधडक ऐवढी जोरात होती की कार बसवर धडकताच कारमधील सेफ्टी ऐअर बॅग उघडल्या गेल्या. कारची काच फुटली. बॅग उघडल्या गेल्यामुळे कारमधील शांताराम पाटील, त्यांच्या पत्नी तसेच चालक संजय गाढे यांना कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु या अपघातात कारला आग लागल्याने पाटील दाम्पत्याने स्वत:च्या बचावासाठी पळ काढला. नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. जैन कंपनीचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला होता.अपघात घडल्यानंतर बसचालक पसार झाल्याची माहिती मिळाली.

अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार महारू गायकवाड, उमेश गायकवाड, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर शांताराम पाटील यांनी बसचालकाविरूध्द पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.