शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

कंटनमेंट झोनमधील बँकांचे व्यवहार ग्राहकांसाठी बंद - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:38 IST

लॉकडाऊनच्या काळात जुन्या इमारतींची दुरुस्ती व असुरक्षित इमारती पाडण्यास बंदी नाही जळगाव : जळगाव जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी Containment Zone ...

लॉकडाऊनच्या काळात जुन्या इमारतींची दुरुस्ती व असुरक्षित इमारती पाडण्यास बंदी नाही

जळगाव : जळगाव जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी Containment Zone घोषित करण्यात येईल. त्या त्या ठिकाणचे/क्षेत्रातील/परिसरातील बँकेतील सर्व अंतर्गत कामकाज सुरळीपणे सुरु राहील. तथापि, संबंधित बँकांचे व्यवहार ग्राहकांसाठी/नागरीकांसाठी सुरु असणार नाहीत. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

  करोना विषाणू (कोव्हिड 19) च्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणे/क्षेत्रे Containment Zone घोषित करण्यात आलेले आहे. याठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून Containment Zone अंतर्गत येणारे सर्व बँकींग व्यवहार देखील बंद केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

  कंटन्मेंट झोन (Containment Zone) अंतर्गत येणाऱ्या बँकांनी ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा पुरविण्याबाबत प्राथम्याने कार्यवाही करावी. ग्राहकांना घरपोच सुविधा (उदा. बँकमीत्र, पोस्ट खात्यामार्फत सुविधा) देण्याचा प्रयत्न करावा. Containment Zone अंतर्गत येणाऱ्या बँकेतील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच बँकेत हॅण्डवॉश, सॅनिटाईजर्स व हात धुण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देशही डॉ ढाकणे यांनी बँकांना दिले आहे. 

*लॉकडाऊनच्या काळात जुन्या इमारतींची दुरुस्ती व असुरक्षित इमारती पाडण्यास बंदी नाही*

  लॉकडॉऊनमधून वगळण्यात आलेल्या बाबी, घटक आस्थापना यांचेकरीता सुचना, निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाकडील सुधारीत आदेशान्वये बांधकाम क्षेत्राबाबत तातडीने पूर्ण करावयाच्या मान्सूनपूर्व कामांसोबतच Protection of Building, Shuttering, Water Proofing, Flood Protection, Propping and Structural repairs of building, demolition of unsafe buildings  इत्यादी कामे सुरु राहतील. 

  तथापि सदर कामे पुर्ण करीत असतांना शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे आदेश, निर्देशान्वये या कामांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. तसेच सर्व संबंधितांनी कामाच्या ठिकाणी हॅण्ड वॉश, सॅनिटाईजर्स व हात धुण्याची व्यवस्था करावी. 

  सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव