शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कालवे व पाटचाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 21:46 IST

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची मागणी : जामदा उजवा-डावा कालवा व पाटचारीची दुरवस्था

भडगाव : गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढली असून सफाई करण्यात यावी. यासह काही ठिकाणी दुरुस्ती व पाटचाऱ्यांचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.रब्बी हंगामातील पिकांना कालव्यांच्या आवर्तनानुसार पाण्याचा लाभ मिळण गरजेचे आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागाने तात्काळ या कामांना सुरुवात करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.यावर्षी सर्वत्र धो धो पाऊस बरसल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक वर्षांतून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. नाशिक जिल्हयातील गिरणा धरणावर गिरणा नदीतील पाण्याची आवक अवलंबून आहे. मात्र यावर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने गिरणा काठावरील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन गिरणा नदीला सुरुच असल्याने गिरणामाय खळखळून वाहत आहे. त्यात आता रब्बी हंगामासाठीही गिरणा नदीला व गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. कालव्यांना सुरुवातीस २ पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहीती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. यावर्षी गिरणा जामदा उजवा व डावा कालव्यालगत दुतर्फा गवत, झडपांसह घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे कालवे अस्वच्छ बनले आहेत. दोघा कालव्यांना काही ठिकाणी व मुख्य पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. आता रब्बी हंगामाला कालव्यांतून पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. तरी पाटबंधारे विभागाने तत्काळ गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याची दुतर्फा साफसफाई करावी. तसेच काही ठिकाणी कालव्याच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी होत आहे.