या तक्रारीवरुन रविवारी दुपारी नायब तहसीलदार सुभाष कुंभार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे न्याय वैदिक शास्त्र डॉ. वैभव सोनार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत, पोलीस उपनिरीक्षक एस. पी. बनसोड यांचे पथक अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी दाखल झाले. शेख आलिद शेख सलाउद्दीन यांच्या शेताच्या बांधावर मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता. याठिकाणी बालिकेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत होता. यादरम्यान डॉ. वैभव सोनार यांनी इन कॅमेरा शवविच्छेदन केले. यावेळी पोलीस कर्मचारी भरत लिंगायत, श्रीराम धुमाळ, गोपाळ माळी, आरोग्य सहाय्यक अशोक सुरडकर, पोलीस पाटील डॉ. सुभाष चिकटे, आरोग्य कर्मचारी नारायण तुपकर, विजय पांढरे ग्रामपंचायत सदस्य विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
व्हिसरा राखून ठेवला असून याबाबत पोलिसांकडे अहवाल सादर करण्यात येईल.
-डॉ. वैभव सोनार, न्याय वैदिक शास्त्र, विभागप्रमुख तथा प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव
व्हिसारा वैद्यकीय चाचणीसाठी नाशिक येथील फाॅरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून अहवालाच्या चाचणीनंतर बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर कारवाईची दिशा निश्चित होईल.
- एस. पी. बनसोड, तपास अधिकारी, पहूर पोलीस स्टेशन
050921\05jal_19_05092021_12.jpg
लोंढ्री तांड्यातील बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढताना उपस्थित सुभाष कुंभार, डॉ. वैभव सोनार, डॉ. संदीप कुमावत व एस. पी. बनसोड आदी.