आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ : दिवसेंदिवस वाढत जाणाºया अन्यायामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सरकारही याप्रश्नी उदासीन असून शेतक-यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आमची मागणी आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी सन्मान अभियान अंतर्गत खासदार शेट्टी यांचे ३ रोजी जळगावात आगमन झाले. यानिमित्ताने शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी अभियानाबाबत माहिती दिली.१० मे रोजी जिल्हाधिकाºयांना विशेष अधिवेशनाबाबत निवेदनशेतकºयांच्या प्रश्नी देशभरातील १९३ शेतकरी संघटनांना एकत्र करुन अ. भा. किसान संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून शेतकºयांच्या प्रश्नी एक आठवड्याचे लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीचे निवेदन देशभरातील जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे.कर्जमुक्ती आणि हमीभाव ही दोन विधेयके या अधिवेशनात मंजूर करावी अशी अपेक्षा आहे. या अधिवेशनात कोण शेतकºयांसोबत आहे, हे सुद्धा दिसून येईल, असेही शेट्टी म्हणाले.प्रधानमंत्री कार्पोरेट बचाव योजनापीक विमा योजनेत ९०४१ कोटी रुपये जमा केले मात्र परतावा फक्त ७१४ कोटी केला. मोठ्या कंपन्या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसा कमवत असून पीक विमा योजना ही शेतक-यांसाठी नसून तर प्रधानमंत्री कार्पोरेट बचाव योजना आहे, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नी अधिवेशन बोलवा : खासदार राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:37 IST
मागणीसाठी देशभरात जिल्हाधिका-यांना शेतकरी निवेदन देणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नी अधिवेशन बोलवा : खासदार राजू शेट्टी
ठळक मुद्दे१० मे रोजी जिल्हाधिका-यांना विशेष अधिवेशनाबाबत निवेदनकर्जमुक्ती आणि हमीभाव ही दोन विधेयके या अधिवेशनात मंजूर करण्याची अपेक्षापीक विमा योजना प्रधानमंत्री कार्पोरेट बचाव योजना असल्याचा आरोप