शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सी. सी. आय. ने कापूस खरेदी सुरु करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 17:02 IST

मागणी : व्यापाऱ्यांकडून कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची लूृट

हरताळा, ता. मुक्ताईनगर :  कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुक्ताईनगर, बोदवड येथील सीसीआयची खरेदी दिवाळीपूर्वी सुरू करा तसेच सततच्या पावसाचा आर्थिक फटका बसलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र शासनाने भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. काही शेतकऱ्यांना उभ्या पिकात जनावरे सोडावी लागली.  कापूस उत्पादक शेतकर्‍यांची अडचण गुलाबी बोंड अळीने वाढून कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दराप्रमाणे ५८०० रुपयापर्यंत भाव मिळावा अशी अपेक्षा असताना शेतकऱ्याला आपला  माल ४६००ते ४८०० रुपये दराने विकावा लागत आहे .  सुमारे एक हजार ते अकराशे रुपयांच्या फरकाने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी विभागाने देखील याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे व शेतकर्‍यांनी केली आहे.आता रब्बी हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते , पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे.  त्यात तोंडवर असलेल्या दिवाळीचा खर्च असल्याने कापूस विकल्या शिवाय पर्याय नाही . मात्र अद्यापही शासकीय कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना हजार ते अकराशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कापूस वेचणी सात ते आठ रुपये किलो मजुरी देऊन  करावी लागत आहे . शेतात टाकलेले उत्पन्न घरात कसे येईल या विवंचनेत शेतकरी आहे. असे असून देखील शासनाला मात्र कापूस खरेदीचा अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.