शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

‘हमी’ पेक्षाही कमी दरात कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:15 AM

खासगीसह, शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

ठळक मुद्दे भावात सातत्याने घट

अजय पाटील ।जळगाव : भाव वाढेल या अपेक्षेने शेतकºयांनी चार महिने वाट पाहिल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून शेतकºयांकडून कापूस विक्रीसाठी काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकºयांकडून माल विक्रीसाठी आणल्यानंतर शासकीय व खासगी जिनींगवर शेतकºयांकडून नियम व अटीं दाखवून हमीभावापेक्षाही कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच फरदड नसतानाही फरदड असल्याचे सांगत शेतकºयांचा मालामध्ये दोष शोधले जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.यावर्षी जरी पाऊस चांगला झाला नसला तरी कापसाची गुणवत्ता गेल्यावर्षापेक्षाही चांगली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील कमी असल्याने कापसाचा दर्जा चांगला असल्याने यंदा कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांची होती. तसेच शासनाकडून ५४५० प्रतीक्विंटल इतका हमीभाव निश्चित करण्यात आल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांची होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात ६ हजार प्रतीक्विंटलचा दर मिळाल्यानंतर दिवाळीनंतर कापसाच्या दरात सारखी घट झालेली पहायला मिळाली. त्यात मकरसंक्रांतीनंतर देखील कापसाला उठाव आला नसल्याने शेतकºयांची निराशाच झाली आहे.वाट पाहिल्यानंतर शेतकºयांकडून कापूस विक्रीचार महिने भाव वाढीची अपेक्षा फोल झाल्यानंतर आता शेतकºयांकडून बाजारात कापूस आणला जात असताना,आता सीसीआय व व्यापाºयांकडून आता मनमानी पध्दतीने भाव निश्चित केले जात आहेत. यंदा कापसाची गुणवत्ता चांगली असतानाही व्यापारी व सीसीआयच्या केंद्रावर कापसाचा उतारा कमी दाखवला जात आहे. त्यामुळे शेतकºयांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फरदड नसतानाही परत केला जातोय कापूसयंदा शेतकºयांनी आपल्याकडील कापूस जानेवारी महिन्यापर्यंत विक्रीसाठी आणलाच नव्हता. आता शेतकºयांकडून विक्रीसाठी आणला जाणारा कापूस हा सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानचा आहे. मात्र, कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांचा हाच माल फरदड असल्याचे सांगत परत केला जात आहे. किंवा कमी दराने खरेदी केला जात आहे. हमीभाव ५४५० इतका निश्चित केला असताना शासकीय खरेदी केंद्रावर ५ हजार ते ५३०० रुपयांप्रमाणे कापूस खरेदी केली जात आहे.गुन्हे दाखल करण्याची मागणीकापसासाठी हमीभाव निश्चित केला असतानाही हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकºयांकडून सीसीआयच्या केंद्रप्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. जिल्ह्यात सीसीआयचे आव्हाणे, वºहाड व जामनेर या तीनच ठिकाणी कें द्र सुरु आहेत. खरेदी केंद्रावरच हमीभावापेक्षा कमी दराने कापूस केला जात असल्याने खासगी व्यापारी देखील सीसीआयच्या भावापेक्षा केवळ १०० ते २०० रुपयांची वाढ देवून माल खरेदी करत आहेत.संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना फेलोशिप द्याजळगाव - पूर्णवेळ संशोधन करणाºया विद्यार्थ्यांसाठी मासिक नऊ हजार रूपये फेलोशिप सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.निवेदन देऊन केले़ यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ा्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हा प्रमुख प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी, नगरमंत्री योगेश पाटील, महेश कचरे, अतुल तेली, हर्षल तांबट, श्रुती शर्मा व भावना शंकोपाळ उपस्थित होते.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाव वाढीची अपेक्षालोकसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कापसाचे भाव वाढतील अशी एकमेव आशा शेतकºयांना लागली आहे. तसेच मार्च एण्डमध्ये देखील कापसाचे भाव वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कापूस बाजारातील जाणकारांच्या मते कापसाचे भाव जरी वाढले तरी ते भावात मोठा फरक राहणार नाही.