पारोळा :
पारोळा तालुका हा नॅशनल हायवे क्रमांक सहावर आहे. तालुक्यातील बहुतांश प्रवासी हे रेल्वे सुविधा नसल्याने लालपरीवर अवलंबून आहे, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात लालपरी जरी बंद असली तरी लॉकडाऊननंतर बस वाढल्या व प्रवासीही वाढले आहेत. लॉकडाऊनकाळात मोजक्याच म्हणजे सुमारे २० बसफेऱ्या होत्या, त्या अनलॉकप्रक्रियेनंतर अडीचशेच्या घरात पोहोचल्या आहेत.
पारोळा बस स्थानकातून दिवसाला १५ ते २० बसेस प्रवासी घेऊन जात होत्या; परंतु १ जूनपासून रोज अडीचशे-तीनशे बसफेऱ्या धावत आहेत. त्यामुळे अनलॉकनंतर बसेसचेही उत्पन्न वाढले व परिसरातील व्यावसायिकांचाही व्यवसाय सुरळीत सुरू झाला आहे.
काँक्रिटीकरण रखडलेलेच
पारोळा बस स्थानक हे गेल्या बारा वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. त्यातील बसेस पार्किंगच्या जागेत कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे व आजूबाजूचा परिसर हा डांबरीकरण करण्यात आला होता. त्यानंतर मात्र काम झाले नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात गुडघ्या एवढे मोठमोठे खड्डे पडलेले असतात. या ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे.
ग्रामीण भागातील बसेस बंद
अनलॉकनंतर लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील बसेस या जवळपास पूर्णतः बंदच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील लोकांना शहराकडे येण्या-जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत असून, बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे.
उत्पन्नाच्या बसेस सुरू कराव्यात
एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या आहेत, तसेच ग्रामीण भागात शाळा बंद असल्याने बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत; परंतु ज्या ग्रामीण भागातील बसेसमुळे असे उत्पन्न मिळते, अशा बसेस सुरू कराव्या, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून होत आहे.
---
१६सीडीजे ५