शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडीत बस घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:29 IST

प्रवासी बालंबाल बचावले : साईडपट्या नसल्याने घडली घटना

वरखेडी, ता.पाचोरा : वरखेडी येथे रस्त्यावरून बस घसरली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. साईडपट्या भरल्या नसल्याने ही घटना घडली आहे.दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे.वरखेडी स्थानक ते बहुळा नदीवरील पुलापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले आहे. साईडपट्ट्या न भरल्यामुळे शुक्रवारी सकाळी १०.१५ ते १०.३० वाजेच्या दरम्यान पाचोरा कडून राजुरी मार्गे पिंपळगाव (हरेश्वर) कडे जाणारी बस रस्त्याला लागून उभ्या असलेल्या पाण्याने भरलेल्या ट्रँकर जवळून पास करत असतांना रस्त्याच्या शेजारी असलेल्या नालीत घसरली. जवळजवळ दोन ते तीन फूट उंच रोड असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या ओट्यांना ही बस जाऊन थांबली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते सर्वांची एकच घाबरगुंडी उडाली, अशी माहिती चालक दीपक शेवरे व वाहक जी.डी.साठे यांनी दिली.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाचोरा येथील कनिष्ठ अभियंता डी.एम.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या बस घसरण्याच्या घटनेची माहिती कळवून साईडपट्ट्या नसल्यामुळे हा प्रकार झाल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे. बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. ते सर्वच सुदैवाने बचावले. बस घरांच्या भिंतीला लागून थांबली अन्यथा घरांच्या भिंती पडून देखील मोठी हानी झाली असती, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात