भागवत सुकलाल चौधरी (रा. पारोळा) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार त्यांचे साडू, सेवानिवृत्त वन अधिकारी नारायण राघो चौधरी (शेवडी गल्ली, ता. पारोळा) हे २ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घरी आले असता घरातील मुख्य प्रवेशद्वार उघडून आत बघितले असता घरातील लोखंडी कपाट व सामान अस्ताव्यस्त होते.
घराच्या छताला असलेल्या डकची लोखंडी जाळी कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटातील दीड लाख रुपये रोख व पाच तोळे सोने असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत आज पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.