शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कुसुंब्यात दोन ठिकाणी घरफोडी, दुचाकीसह अडीच लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 18:48 IST

चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री एका शेतकºयाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. दुसºया घरातही त्यांनी हैदोस घातला परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही. मात्र तिसºया रहिवाशाची नवी कोरी दुचाकी लांबवून पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.

ठळक मुद्देशेतात रात्री पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकºयाचे घर फोडलेदुसºया घरातील साहित्याची केली फेकाफेकलोडशेडींगच्या फटक्यात चोरट्यांनी टाकली भर

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.४ : तालुक्यातील कुुसुंबा येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून सोन्या- चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह दोन लाख चाळीस हजाराचा ऐवज लंपास केला. दुसºया घरातही चोरट्यांनी हैदोस घातला मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. चोरट्यांनी या घराच्या शेजारी असलेल्या एका रहिवाशाची नवीन दुचाकी घेऊन पोबारा केला.पोलीस सूत्रानुसार, ३ रोजी रात्री ८ ते ४ रोजी पहाटे १:३० वाजेच्या दरम्यान शरद ओंकार पाटील यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोंडा कटरने तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील दोन लोखंडी कपाट तोडून त्यातील सामान अस्ताव्यस्त केला. तसेच शोकेसमधील लॉकरमध्ये ठेवलेले ४० ग्रॅम सोन्याच्या पाटल्या, १५ ग्रॅम वजनाचा चपला हार, एक ग्रॅम सोन्याचा तुकडा, पाच ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रॅमचे टोंगल, चार हजार रुपये किंमतीचे २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन तोडे व रोख १५ हजार असा एकूण एक लाख ऐंशी हजाराचा ऐवज लंपास केला.तसेच श्यामकांत पंढरीनाथ पाटील यांच्या घराच्या दरवाजाच्या कडीकोंडा तोडून घरात असलेल्या कपाटातील व डब्यामधील साहित्य अस्ताव्यस्त फेकले मात्र येथून चोरट्यांच्या हातात कोणत्याही मौल्यवान वस्तू लागल्या नाहीत.चोरट्यांनी या घराच्या शेजारील रहिवासी वैभव रंगराज पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी विकत घेतलेली साठ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी (क्रमांक एम एच १९ डी सी ५२४९) लंपास केली.याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला शरद ओंकार पाटील (५०) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भाग ५ गु र नं ५/२०१८ भादंवि ४५४, ४५७ ,३७९ , ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर हे करीत आहेत.लोडशेडींगमुळ चोरट्यांचे फावलेग्रामीण भागात सद्या शेतीपंपासाठी लोडशेडींगमुळे दिवसा वीजपुरवठा न देता रात्री उशिरा वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकºयांना रात्री पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते. ज्यांच्या घरात चोरी झाली ते शरद पाटील हरभरा पिकाला पाणी भरण्यासाठी रात्री आठ वाजता घरून गेले होते. दीड वाजता ते शेतातून घरी परतल्यावर त्यांना दरवाजा उघडा दिसला. रात्री ८ ते दीड वाजेच्या दरम्यान ते शेतात असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोने, चांदीचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला. 

टॅग्स :theftचोरी