शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 19:11 IST

भडगाव शहरातील शिवाजीनगर संत सेना महाराज मंदिराजवळ ७ रोजी मध्य रात्री चोरट्यांनी गोविंदसिंग हिलाल पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरातील व्यक्तींना मारहाण करत दोन लाखांची जबरी चोरी केली व चोरटे पसार झाले.

ठळक मुद्देदोन लाखांची चोरीप्रतिकार केला म्हणून केली मारहाणचोरटे झाले पसार

भडगाव : शहरातील शिवाजीनगर संत सेना महाराज मंदिराजवळ ७ रोजी मध्य रात्री चोरट्यांनी गोविंदसिंग हिलाल पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरातील व्यक्तींना मारहाण करत दोन लाखांची जबरी चोरी केली व चोरटे पसार झाले.गुरुवारी मध्य रात्री गोविंदसिंग पाटील यांच्या घराच्या पुढील दरवाजाचा व आजूबाजूच्या घरांचेदेखील बाहेरून कडी लावले. यानंतर मागील दरवाजाची कडी तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश करुन हिंदीमधून ‘हम तुम्हे मारेंगे नही, जो तुम्हारे पास होंगा, निकाल दो’ असे म्हणत घरातील कपाटातील सामान फेकला. त्याला गोविंदसिंग यांनी प्रतिकार केला. तेव्हा एकाने डोक्यावर वार करून जखमी केले. कपाटातील रोख रक्कम, २२ ग्रॅम सोन्याची पोत, मणी मंगळसूत्र, पाच ग्रॅम कानातील सोन्याचे झुंबर व पाच ग्रॅम काप, पाच ग्रॅम अंगठी, चांदीच्या साखळ्या असे दोन लाख १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरुन नेला.याबाबत सरिता गोविंदसिंग पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव करीत आहे.घटनास्थळी चाळीसगाव अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय नाजिर शेख, पोलीस निरीक्षक धनजय येरुळे, पो.ना.लक्ष्मण पाटील, पो.ना.नितीन राउत, पो.काँ.समाधान पाटील, पो.काँ.ईश्वर पाटील तपास कामी भेट दिली. घटनास्थळी जळगावच्या श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. या घटनेने नागतिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhadgaon भडगाव