शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

भुसावळात भरधाव डंपरच्या धडकेत बुलढाण्याचे दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:59 IST

चालकास अटक

भुसावळ  : लग्नासाठी भुसावळात आलेल्या बुलढाण्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने कट मारल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला . ही घटना शुक्रवार रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास खडका चौफुलीवर घडली. यासंदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे.या दुर्घटनेबाबत माहिती अशी की,  चंद्रकांत जगन्नाथ वराडे  (६३ ), संध्या चंद्रकांत वराडे( ५६ ) दोन्ही रा. चिखली रोड , बुलढाणा हे भुसावळ येथील गडकरी नगरात नातेवाईकांकडे लग्नसमारंभासाठी आले होते. गुरुवार रोजी त्यांनी देना नगरातील नातेवाइकांकडे मुक्काम केला. त्यानंतर सकाळी वराडे हे मोटरसायकलवर (एम. एच. २८ - ६६७१)  या मोटरसायकलने खडकारोडने गडकरी नगरकडे जाण्यासाठी निघाले होते. खडका चौफुली जवळ येताच डंपरचा  ( एम . एच. १९ झेड - ३१९२) त्यांच्या मोटर सायकलला कट लागला . त्यामुळे दुचाकी एकदम घसरली. या अपघातात पती व पत्नी हे डंपरच्या मागील चाकाखाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत ,  सचिन पोळ ,, संजय भदाणे,  कृष्णा देशमुख , रमण सुरडकर , भालेराव यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात णे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   डंपर चालक महेंद्र ब्रिजलाल कोळी रा. भोरटेक ता. यावल यास अटक करण्यात आली आहे.