शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून उभे राहिलेले भुसावळचे जेतवन बुद्धविहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:48 IST

भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या कंडारी प्लॉट भागात सम्राट अशोक नगरात लोकसहभागातून जेतवन बुद्धविहार उभे राहिले आहे.

ठळक मुद्देकंडारी प्लॉट, सम्राट अशोक नगरग्रामस्थांनी एकी करून एकाच रात्री घेतली बैठकअन केली कामाला सुरुवात

हबीब चव्हाणभुसावळ, जि.जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या कंडारी प्लॉट भागात सम्राट अशोक नगरात लोकसहभागातून जेतवन बुद्धविहार उभे राहिले आहे. ग्रामस्थांनी बैठक घेऊन तापीनदी पात्रातून वीट भट्टीवरून विटा आणल्या आणि श्री गणेशा केला.कंडारी प्लॉटस येथे बुद्ध विहाराची संकल्पना येथील रहिवासी सुमंगल रवींद्र अहिरे, फकिरा हुसले, भिका बागुल, भगवान देवरे, वार्ड अध्यक्ष पांडुरंग लोखंडे यांनी मांडली. त्यांनी विचार केला की आपल्या गावात चांगले व मोठे बुद्धविहार बांधले पाहिजे यासाठी कंडारी प्लॉटस येथे बैठक घेण्यात आली. फकिरा पहेलवान यांच्या आखाड्याच्या काही तरुणांनीदेखील ह्या कामात सहभाग घेतला. पांडुरंग लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.शिंगारे यांच्या घरासमोर फार मोठे पटांगण होते. त्या ठिकाणी सहा हजार ६० चौरस फूट जागा मोजून एकाच रात्रीच गावातील मुलांनी तापी नदीजवळील वीटभट्ट्यांवर जावून विटा जमा केल्या. मध्यरात्री एक चबुतरा बाळूू मिस्त्री, लहानू गरुड, गौतम मिस्त्री यांनी बांधला. त्या चबुतऱ्यावर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते १९८७ मध्ये बुद्धविहाराची पायाभरणी करून लहान मूर्ती स्थापन करण्यात आली.या वेळी उपस्थित पांडुरंग लोखंडे, रवींद्र अहिरे, फकिरा पहेलवान, सुरेश लोखंडे, कैलास ढिवरे, विश्वनाथ पंडित गायक, प्रभाकर देवरे व गावातील नागरिक उपस्थित होते. यानंतर बुद्धविहाराच्या बांधकामासाठी गावातील लोकांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीत अध्यक्ष भिका बागुल, उपाध्यक्ष म्हसाजी वाघमारे, सोनवणे बाबूजी, सकाभाऊ निकम यांनी गावामधून व भुसावळसह परिसरातून विहार बांधण्यासाठी धम्म दान गोळा करण्यास सुरुवात केली. देणगी गोळा झाल्यानंतर विहार बांधायला सुरुवात झाली.नंतर महेंद्र यशोदे यांनी विहाराचे काम हाती घेतले. देणग्या कमी पडल्यावर काही वर्षे काम बंद करण्यात आले. मग १४ एप्रिल २००१ रोजी बैठक घेण्यात आली. त्यात बुद्धविहाराचे काम कसे होईल यासाठी राजेश आव्हाड, संभाजी सोनवणे, विजय बाºहे यांनी पूर्ण विहार हातात घेऊन तीन महिन्यांत काही प्रमाणात देणग्या गोळा करून पुन्हा विहाराच्या कामाला सुरवात केली.काही प्रमाणात काम पूर्ण झाल्यावर त्या विहाराचे नाव ‘जेतवन बुद्धविहार’ असे ठेवावे असे रवींद्र अहिरे यांनी सुचवले व विहारात सुरेश गायकवाड रा.पारस, जि.अकोला यांनी त्या वेळेस त्यांच्या कामगार कल्याण निधीतून ३५ हजार किमतीची बुद्ध मूर्ती भेट म्हणून दिली. यानंतर बुद्ध पौर्णिमेला २५ मे २००२ दिवशी मूर्तीची स्थापना करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढून मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते विहारात मूर्ती बसवून विहारचे उद्घाटन करण्यात आले. त्या दिवसापासून तर आजपर्यंत विहारात समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येतात. दर रविवारी बुद्धवंदना घेण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून विहाराची देखभाल आनंद पुंडलिक खेडकर हे करतात.जेतवन बुद्धविहार येथील पंचधातूची बुद्ध मूर्ती ही बुद्ध (गया) बिहार येथून आणण्यात आली होती. बुद्धविहारात दर वर्षी तीन महिने वर्षावास कार्यक्रम घेतला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले व इतर महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम घेतले जातात.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ