शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरुषाला समान दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:59 IST

अज्ञान आणि हिंसा बुद्धधम्माच्या विरोधी आहे़

अज्ञान आणि हिंसा बुद्धधम्माच्या विरोधी आहे़ प्रसेनजित राजाची गोष्ट बघा... एकदा राजा बुद्धासोबत धम्मावर चर्चा करीत होते़ एवढ्यात महालातून एक दूत आला़ त्यांनी राजांच्या कानात सांगितलं की प्रमुख राणी मल्लिकाने एका पुत्रीला जन्म दिला आहे़ राजा हे ऐकून दु:खी झाला़ बुद्धांनी विचारले काय झाले? तुझा चेहरा असा का नाराज झाला़? तेव्हा बुद्धांनी पुढील प्रमाणे उपदेश दिला़ बौद्ध म्हणतात काही स्त्रिया खरोखरच पुरूषांपेक्षा योग्य आणि सुंदर असतात़ त्या आपल्या सासुला आदर्श मानतात आणि स्वत:ही पवित्र असतात़ हे राजा अशी स्त्री महाकुलीन पत्नी बनून, एक श्रेष्ठ मुलाला जन्म देईल, जो पुढे जगात एका जगात एका प्रमुख देशाचा राजा बनेल़ राजाला बुद्धवचन ऐकून गहिवरून आलं आणि त्याच्या राणी आणि कन्येचा स्वीकार केला़हे उच्च स्थानाची बुद्धांची शिकवण आहे़ परंतु आजही मुलींचा जन्म हा आनंदी मानला जात नाही़ जर त्या ठिकाणी मुलगा झाला तर आनंदाला पारावर नसतो़ सर्वोच्च आनंद म्हणजे मुलाचा जन्म अशी आजही भावना आहे़ मनुष्याची उत्पत्ती प्राकृतिक विकासाच्या प्रक्रियेद्वारे झालेली आहे़ या जगात गौतम बुद्धांनी सर्वप्रथम प्राकृतिक नियमांचा उल्लेख केला आहे़ पुरूष असो वा स्त्री जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्याला कोणीही वाचवू शकत नाही़बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरूषाला समान दर्जा आहे़ बौद्ध कालीन शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरूष हे दोन्ही सारखे आहेत़ बौद्ध धम्म हा प्राकृतिक विलक्षणतेच्या विश्लेषणावर आधारीत असल्या कारणाने स्त्री आणि पुरूष हे दोन्ही सारखे आहेत़ स्त्री आणि पुरूष यांना भिक्कू म्हणूननच संबोधले जाते़ बौद्ध संस्कृतीतील स्त्रिया खेमा, मगध नरेश बिंबिसार राजाची राणी असो, सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा, गणिका असलेली आम्रपाली या सगळ्या स्त्रिया सारख्याच़ स्त्री शिक्षणासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केला़ आजही शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते़ सदगुण, प्रेम, स्रेह ही क्षणिक नाही तर अनंत काळासाठी असावे. स्त्री ही सदाचाराची ठेव आहे़ उदारता हे स्त्रीचे औषधं आहे़मी कामवासनेच्या दुराचारापासून अलिप्त रहाण्याची शिकवण ग्रहण करतो़ मी परस्त्रीकडे वाईट दृष्टीकोनाने बघणार नाही़ अशी बुद्धांची शिकवण धम्मपदात आहे़स्वत:च्या शरीरावरती संयम उत्तम आहे़ वाणीचा संयम उत्तम आहे़ सर्व इंद्रियांचा संयम उत्तम आहे़ सर्व प्रकारे संयमित असण्यामुळे भिक्खु सर्व दु:खातून मुक्त होतो़ हे धम्मपदात असलेले वचन सर्व भिक्खु संघाला उपदेशून आहे़ स्त्रियांना वेगळे आणि पुरूषांना वेगळे असे काही नाही़- सरोजिनी गांजरे- लभाणे, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव