शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

वरणगाव येथे वीटभट्टीचालकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:48 IST

वरणगाव शहरात वीट व्यावसायिक सुनील ओंकार चौधरी (वय ५२, रा.शिवाजी नगर) यांची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना साईनगरच्या शेवटी घडल्याने सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्देपैशाच्या देवाण घेवाणीतून खून झाल्याचा संशयश्वानपथकातील जंजिरा श्वान घटनास्थळाजवळच घुटमळले.ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी जमिनीवर पडलेल्या रक्ताचे नमुने घेतले.

वरणगाव, जि.जळगाव : शहरात वीट व्यावसायिक सुनील ओंकार चौधरी (वय ५२, रा.शिवाजी नगर) यांची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना साईनगरच्या शेवटी घडल्याने सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. दरम्यान, खुनाच्या घटनेने वरणगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील चौधरी हे रविवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने शिवाय त्यांचा भ्रमणध्वनी स्वीच आॅफ मिळत असल्याने घरच्यांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला. मात्र शोध लागला नाही. सोमवारी सकाळी वरणगाव पोलीस ठाण्यात सुनील चौधरी हरविल्याची नोंद दाखल करण्यात आली. यानंतर काही वेळातच त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.आर्थिक देवाण घेवाणीतून खूनचौधरी हे वीटभट्टी व्यवसायासह जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. याच व्यवहाराच्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून त्यांचा खून झाल्याचा संशय त्यांचा मुुलगा तुषार चौधरी यांनी व्यक्त केला.सुनील चौधरी रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत फुलगाव फाट्यानजिक त्यांच्या वीटभट्टीवर होते. त्यानंतर ते घराकडे निघाले. परंतु ते घरी पोहचलेच नाही.निर्घृण खूनसाईनगराच्या शेवटी नवीन बांधकाम झालेल्या घराजवळ सुनीलला अज्ञात मारेकऱ्यांनी गाठून त्यांची दुचाकी एका बाजूस फेकून दिली. विटांनी त्यांचा चेहरा व डोके ठेचून खून केला. त्यांचा मृतदेह घराच्या आडोशाला फेकून दिला. त्यांच्या गळयातील सोन्याची साखळी व अंगठी घेऊन मारेकरी घेऊन पसार झाले. मारेकºयांनी अत्यंत निर्दयपणे सुनील चौधरी यांची हत्या केली. मारेकºयांची क्रूरता इतकी भयानक होती की, त्यांचा चेहरा त्यांनी रेतीच्या ढिगाºयात खुपसला होता. त्यामुळे त्याच्या तोंडात, नाकात व कानातही रेती भरलेली होती.जळगाव येथील सामान्य रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.तुषार चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकºयांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे करीत आहेत.कुटुंबियांचा आक्रोशमयताच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. कुटुुंबियांना खुनाची घटना समजताच त्यांनी आक्रोश केला. तो पाहून उपस्थितांची मने हेलावली.दरम्यान, घटनास्थळी मुक्ताईनगचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक मनोज पवार यांनी भेट देत अधिकाºयांना तपासकामी सूूचना केल्या. येथे रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यस्वंस्कार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, त्याआधारे आरोपी दृष्टिक्षेपात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ