शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रावेर-पुनखेडा मार्गावरील भोकर नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 15:11 IST

रावेर तालुक्यातील रावेर-पुनखेडा मार्गावर भोकर नदीवरील पूल शुक्रवारी नदीच्या रूद्रावताराने खचला आहे.

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील रावेर-पुनखेडा मार्गावर भोकर नदीवरील पूल शुक्रवारी भोकर नदीच्या रूद्रावताराने खचला आहे.रावेर-पुनखेडा दरम्यान भोकर नदीवरील पूल सन २०१४ मध्ये अतिवृष्टीत भोकर नदीच्या महापुरात भगदाड पडून वाहून गेला होता. परिणामी पुनखेडा व पातोंडी येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रेल्वेच्या लोखंडी पुलावर जीव धोक्यात घालून पायी ये-जा करावी लागत होती. म्हणून उभय ग्रामस्थांनी तीव्र असंतोष व्यक्त करून तत्कालीन आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे रेटा लावला होता.त्या अनुषंगाने तत्कालीन आमदार शिरीष चौधरी यांनी तातडीच्या दुरूस्तीच्या उपाययोजनांसाठी व नवीन पुलाच्या उभारणीसाठी पाठपुरावा करून त्या पुलाची तातडीची दुरूस्ती केली होती. आमदार हरिभाऊ जावळे हे त्यानंतर विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनीही या पुलाच्या नव्याने उभारणीसाठी बांधकाम मंत्रालयाकडे सादर केला होता. गत पावणे पाच वर्षांत त्या प्रस्तावावर अनेकदा फेरप्रस्ताव पाठवण्यात आले. किंबहुना त्या पुलावरून जाणाऱ्या रावेर - पुनखेडा ते पातोंडीपर्यंतच्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत नव्याने डांबरीकरण करण्यात आले. रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा वापर करीत असताना गत चार पाच वर्षांंपासून भिजत घोंगडे पडलेल्या या व्हेंटीलेटरवर अंतिम घटका मोजत असलेल्या पुलाचा संबंधित लोकप्रतिनिधी व जि.प. बांधकाम विभागाची मालमत्ता असलेल्या या रस्त्यावर डांबरीकरण करणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाला तरी कसा विसर पडला, असा औत्सुक्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.गत साडेचार ते पावणे पाच वर्षांत रावेरहून मुक्ताईनगरकडे सातत्याने जाणाºया खासदार रक्षा खडसे, तथा आता विधानसभा सदस्यत्वाचा मावळतीचा कार्यकाळ नजीक येवून ठेपला असताना दोघाही लोकप्रतिनिधींना अंतिम घटका मोजत असलेल्या या व्हेंटीलेटरवरील पुलाला नवसंजीवनी देण्याची गरज का भासली नाही, असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.दरम्यान, आभोडा व मंगरूळ धरणांमधून खळाळून वाहणाºया विसर्गाने रूद्रावतार धारण केल्याने शुक्रवारी रावेर-पुनखेडा रस्त्यावरील पूल खचला.रावेर पोलिसांनी या खचलेल्या पुलावर बॅरीकेटस लावून वाहतुकीसाठी बंद केल्याने या पुलावरून अवजड वाहनांची रहदारी थांबवण्यात आली होती. परिणामत: शनिवारी सकाळी अंतुर्ली, धुरखेडा व मुक्ताईनगरकडे जाणाºया एस.टी. बससेवा खंंडित करण्यात आली होती. यामुळे पुनखेडा व पातोंडी येथील विद्यार्थ्यांना रावेरपर्यंत पायी ये-जा करावी लागली म्हणून पालकांनी व विद्यार्थ्यांनीही तीव्र नापसंती व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर रावेर आगार व्यवस्थापकांनी खबरदारी घेऊन सदरची बससेवा सुरळीत करून विद्यार्थ्यांना दिला

टॅग्स :riverनदीRaverरावेर