शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अठरा मिनिटात लांबविला नववधूचा लाखोचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:24 IST

जळगावातील वाघ नगर परिसरात घरफोडी

ठळक मुद्देचोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव : अंगावर चादर, हाफ चड्डी घालून आलेल्या पाच चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा वाकवून कुलुप तोडून अवघ्या अठरा मिनिटात रवींद्र आत्माराम ठाकूर (वय ५२) यांच्या सुूनेचे २५ हजार रुपये रोख व ९० हजार रुपये किमतीचे दागिने असा एक लाख १५ हजार रुपयांचे ऐवज लांबविण्यात आल्याची घटना वाघ नगर परिसरातील श्याम नगरात रविवारी पहाटे घडली. दरम्यान, हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र ठाकूर हे नेपानगर येथील सरकारी पेपर मील मध्ये नोकरीला आहेत. जळगाव येथील वाघ नगर परिसरातील श्याम नगरातही त्यांचे घर आहे. या घरात मुलगा संदीप, सून पूजा, लहान मुलगा शुभम असे राहतात. संदीप याचे २९ डिसेंबर रोजी लग्न झाले. त्यामुळे संदीप व त्याची पत्नी पूजा असे दोन्ही जण कुलुमनाली येथे फिरायला गेले होते. शुभम हा बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी व रविवार सुटी असल्याने तो शुक्रवारीच सायंकाळी नेपानगर येथे वडीलांकडे गेला होता. त्यामुळे घराला कुलुप होते.२.०७ ते २.२५ यावेळेत काम फत्ते२ वाजून ७ मिनिटांनी आलेले चोरटे २.२५ वाजता ठाकूर यांच्या प्रवेश केला. १८ मिनिटात त्यांनी टॉमीने कडीकोयंडा वाकवून घरात प्रवेश करुन साहित्याची नासधूस करुन बेडमध्ये ठेवलेल्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये असलेले २५ हजार, सोन्याची मंगलपोत, दोन अंगठ्या व कानातील दागिने असे ३१ ग्रॅम दागिने काढून पलायन केले. शेजारी राहणारे रतनकुमार थोरात यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेºयात चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहेत.गेल्यावर्षीही झाली होती घरफोडीरवींद्र ठाकूर यांच्या घराच्याच शेजारी गेल्यावर्षी घरफोडी झाली होती.आता पुन्हा याच भागात चोरी झाली आहे. या घटनेतील चोरटे २० ते ३० वयोगटातील आहेत. प्रत्येकाने अंगावर शाल किंवा चादर घेतलेली असून सर्वांची हाफ पँट आहे. चेहराही झाकलेला आहे.वीज नाही, पोलीस गस्त नाहीश्याम नगर हा सावखेडा शिवाराकडे शेवटचा आहे. या भागात वीज पुरवठा सतत बंद असतो. पथदिवे बंद आहेत. त्याशिवाय पोलिसांची गस्तही कधीच होत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. रात्री घरफोडीचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शेजारीला लोकांनी ठाकूर यांचा पुतण्या यश सोनवणे याला फोन करुन माहिती दिली होती. त्यानुसार रवींद्र ठाकूर रविवारी सकाळी नेपानगर येथून जळगावात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेजारच्या वृध्देला पाहताच लपले चोरटेपहाटे २ वाजता चोरटे श्याम नगरात आले असता झोपेतून जागे झालेल्या शंकुतला पुंडलिक ठाकरे (वय ६५) या वृध्देला गल्लीतून पाच जण जाताना दिसले. आपण कोणाच्या तरी नजरेस पडलो असे लक्षात येताच चोरटे ठाकूर यांच्या घराच्या भींतीच्या आडोशाला लपले. हा प्रकार शकुंतला ठाकूर यांनी मुलाला सांगितले. त्यांनी लागलीच शेजारच्या लोकांना मोबाईलवरुन माहिती दिली, तो पर्यंत बराच वेळ झाला होता. त्यामुळे चोरटे घरातून चोरी करुन पसार झाले होते. ते नेमके कोणत्या दिशेने गेले हे स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी