शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडित केल्याने मुक्ताईनगर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:13 IST

मुक्ताईनगर नगरपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज पुरवठ्यापोटी वीज वितरण कंपनीचे पावणे दोन कोटी रुपये थकल्याने सोमवार रात्रीपासून शहराचा पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शहर अंधारात बुडाले होते.

ठळक मुद्देऐन सणासुदीच्या दिवसात शहरात आफतनगरपंचायत प्रशासनाची उडाली धावपळ

मुक्ताईनगर : नगरपंचायतकडे पथदिव्यांच्या वीज पुरवठापोटी पावणे दोन कोटी रुपयांचे बिल बाकी असल्याने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडीत करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात रस्ते रात्रभर अंधारात होते.शहरात नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीस आर्थिक अडचणीचा प्रचंड सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना जि. प. च्या फंडातून वेळीच दिवाबत्तीचे वीजबिल भरले नसल्याने या थकबाकीला डोंगराचे रूप आले आहे. दरवेळेस वीज खंडीत करण्याची कारवाई होत असताना तात्पुरती रक्कम भरून वेळ मारून नेण्यात येत होती. त्यामुळे आता तब्बल १ कोटी ७७ लाख रुपये वीज बिल थकीत झाले आहे. सोमवारपर्यंत मुदत देऊन ही नगरपंचायतने थकबाकी न भरल्याने सोमवारी रात्री शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे.१ लाखांचा भरणादरम्यान, दिवाळीसारख्या सणासुदींचे दिवस असताना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नगरपंचायतची धावपळ उडाली आहे. न.पा. फंडात निधी उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात एक लाख रुपयाचा धनादेश वीज वितरण कंपनीला देण्याची धावपळ नगरपंचायतीत सुरू होती. येथे प्रभारी स्वरूपात देण्यात आलेल्या लेखापालाची कायम नियुक्ती फैजपूर येथे असल्याने त्यांच्या सहीसाठी एक लाखाचा धनादेश घेऊन कर्मचारी फैजपूर येथे दुपारी रवाना झाला आहे. सही झाल्यानंतर हा धनादेश कंपनीकडे जमा करण्यात येणार आहे.दिवाळीनंतर थकीत वीज बिल भरू अशी विनंती वीज वितरण कंपनीला करण्यात आली आहे. वीज बिलाचा शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. परवानगी घेऊन १४ व्या वित्त आयोगातून विज बिल भरण्याचे प्रयत्न आहेत. नगरपंचायतीमध्ये कर वसुली नसल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. - श्याम गोसावी, मुख्याधिकारी नगरपंचायत 

टॅग्स :electricityवीज