शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

निवडणूक निकालानंतर धान्य, डाळींच्या भाववाढीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:52 IST

वायदे बाजार नियंत्रणात

जळगाव : लोकसभा निवडणुकीमुळे सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून बाजारपेठेत वाढत जाणाऱ्या धान्य, डाळींच्या भाववाढीस आता निवडणूक निकालानंतर ‘ब्रेक’ लागला आहे. इतकेच नव्हे तर गव्हासह डाळींचे भाव काही अंशी कमीदेखील झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.१० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशभरात वेगवेगळ््या टप्प्यात विविध राज्यांमध्ये मतदान सुरू झाले. या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारचे बाजारपेठेवरील नियंत्रण कमी झाल्याने त्याचा पुरेपूर फायदा वायदे बाजारातील मंडळी घेऊ लागले होते. त्यामुळे दीड महिन्यातील महागाईचा आकडा पाहिला तर धान्याची चांगली आवक असली तरी त्यांचे भाव वाढत गेले. यात गव्हाचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने तर डाळींचे भाव तब्बल १२०० ते १३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले. या सोबतच शेंगदाणा तेलाचे भावदेखील ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढले.निवडणूक काळात सत्ताधारी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीत कंबर कसून उतरल्याने बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे प्रशासनदेखील निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने बाजारपेठेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने दलाल मंडळींचे यात चांगले फावले व त्याचा फायदा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न या मंडळींकडून सुरू झाला. मात्र निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर बाजारपेठेत भाववाढ रोखली गेली आहे. नवीन सरकार स्थापन झाले नसले तरी किमान निवडणूक संपल्याने त्याचा वचक तरी वायदे बाजारावर असतो, असे जाणकारांनी सांगितले. यासोबतच प्रशासनाचीदेखील निवडणूक कामातून सुटका झाल्याने त्याचाही परिणाम जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.तूर डाळ २०० ते ४०० रुपयांनी कमीनिवडणूक काळात नव्वदी पार होऊन ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचलेले तूर डाळीचे भाव आता ८७०० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे उडीदाच्या डाळीच्या भावातही घसरण होऊन ती ६२०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर तर ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६१०० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. गेल्या आठवड्यात ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात याच भावावर स्थिर आहे. भाजीपाल्याचा तुटवडा असताना डाळींचे भाव कमी झाल्याने तेवढाच दिलासा मानला जातआहे.गव्हातही घरसणनिवडणूक काळात २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढलेल्या गव्हाच्या भावात आता ५० रुपये प्रती क्विंटलने घसरण झाली आहे. २३०० ते २४५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २२५० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवरून २२५० ते २३५० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवरून ३७५० ते ३९५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.तांदुळाचे भाव स्थिरतांदळाचे भावदेखील सध्या स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.वायदे बाजारामुळे खाद्य तेलालादेखील महागाईची फोडणी बसून शेंगदाणा तेलाच्या भावात वाढ होत जावून ते १३० रुपये प्रती किलोवर पोहचले होते. मात्र आता खाद्य तेलाची भाववाढदेखील थांबली आहे.निवडणूक काळात गहू, डाळ यांची झालेली भाववाढ आता थांबली आहे. यात गव्हाचे भाव काही अंशी कमीदेखील झाले आहेत.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव