शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

राज्यातील २७ ठिकाणी वाहनांची ब्रेक चाचणी आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:25 IST

ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल्याने येथे होणाºया चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना नजीकच्या नंदुरबार, नाशिक, बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे चाचणीसाठी जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश  शेजारच्या जिल्ह्यात जावे लागणार वाहनधारकांना२५० मीटर ट्रक आवश्यक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३१  : ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल्याने येथे होणाºया चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना नजीकच्या नंदुरबार, नाशिक, बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे चाचणीसाठी जावे लागणार आहे.

आरटीओची स्वत:ची जागा नसताना अन्य दुसºया खासगी अथवा सार्वजनिक जागेत वाहनांची योग्यता चाचणी घेण्यात येत असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे धोके लक्षात घेता श्रीकांत कर्वे (मुंबई) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र.२८/२०१३) दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत १४ सप्टेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने स्वत:ची २५० मीटर जागा नसलेल्या जिल्ह्यातील आरटीओंनी तातडीने ब्रेक चाचणी थांबविण्याचे आदेश दिले होते. 

राज्यात २७ ठिकाणी  जागा उपलब्ध नाहीराज्यात २७ ठिकाणी आरटीओच्या मालकीचा स्वत:चा २५० मीटरचा ट्रक नाही. त्यामुळे मुख्य सचिवांनी परिवहन बांधकाम विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन तातडीने चाचणीसाठी ट्रॅक तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला गेल्या महिन्यात दिले होते. त्यानुसार सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीत जेथे जागा आहे तेथे तातडीने ट्रक तयार करण्याचे सरकारने सांगितले होते. मात्र अद्यापही राज्यातील २७ ठिकाणी ट्रक तयार होऊ शकले नाहीत. त्यामुळे ३१ आॅक्टोबर ही मुदत संपल्याने १ नोव्हेंबरपासून या चाचण्या घेण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त स.बा.सहस्त्रबुध्दे यांनी मंगळवारी काढले आहेत.

जळगावात ट्रॅक तयार करण्याचे काम सुरुजळगाव आरटीओ कार्यालयाने मोहाडी शिवारात पाच एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणी ट्रक तयार करण्याचे काम सुरु असून डांबरीकरण व कॉँक्रीटीकरणाचे काम बाकी आहे. सध्या पिचींगचे काम सुरु आहे, मात्र काम अपूर्ण असल्याने येथे चाचण्या घेता येत नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. धुळे येथेही ट्रक नाही, त्यामुळे जळगावच्या वाहनधारकांना नंदुरबार, बुलढाणा, मालेगाव, नाशिक व औरंगाबाद या जवळच्या आरटीओ कार्यालयात जावे लागणार आहे. येथील काम पूर्ण झाल्यावरच जळगावात चाचण्या होतील.