शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचा आगामी निवडणुुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:01 IST

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे व शिवापूर येथील शेतकºयांची १२०० एकर जमिन सोलर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने बेकादेशीररित्या हस्तांतरीत केली आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही पीडित शेतकºयांंना अद्याप न्याय मिळालेला नाही. म्हणून त्या निषेधार्थ दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडे तक्रारबोढरे व शिवापूर शेतकºयांची फसवणूकनिवेदनाच्या प्रति प्रशासनाकडेसात-बारा शेतकºयांच्या नावावर असताना त्या जागी सोलर कंपनीने सुरू केला वीज निर्मिती प्रकल्प

चाळीसगाव, जि.जळगाव :  तालुक्यातील बोढरे व शिवापूर येथील शेतकºयांची १२०० एकर जमिन सोलर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने बेकादेशीररित्या हस्तांतरीत केली आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही पीडित शेतकºयांंना अद्याप न्याय मिळालेला नाही. म्हणून त्या निषेधार्थ दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे दिला आहे.तहसीलदार कार्यालयामार्फत निवडणूक आयोगाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वषार्पासून पीडित शेतकरी हे शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. महसूल राज्यमंत्र्यांकडे दोनवेळा या बाबतच्या बैठका झाल्या. त्यांनी चौकशीचे आदेश देवूनही शेतकºयांना न्याय मिळालेला नाही. शंभरपेक्षा अधिक शेतकºयांची फसवणूक झाल्याप्रकरणी महसूल प्रशासनाकडे हरकती घेतल्या आहेत. खरेदी व्यवहाराला दीड ते दोन वर्ष उलटला मात्र सात-बारा शेतकºयांच्या नावावर असताना त्या जागी सोलर कंपनीने वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या कंपन्यांकडे अधिकृत कागदपत्रदेखील नाही ही बाब मुंबई येथे झालेल्या राज्यमंत्री राठोड यांच्या समोर उघडकीस येवूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे पीडित शेतकºयांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान पीडित शेतकºयांना योग्य तो न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति प्रधान मंत्री नवी दिल्ली, मुख्यमंत्री मुंबई, तहसीलदार व पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनावर शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. भरत चव्हाण, भीमराव जाधव, प्रा.गौतम निकम, ओंकार जाधव, विजय शर्मा, आबा गुजर, योगेश्वर राठोड, नासिर भाई शेख, राजू चव्हाण, विश्वजीत नायक, देवेंद्र कुमार नायक आदींच्या स्वाक्षºया आहेत.