शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

भुुसावळ येथे रेल्वे अतिक्रमणधारकांचा मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 19:34 IST

भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील रहिवाशांचा रेल्वे प्रशासनाने भविष्याचा कोणताही विचार न करता बेघर करून, घरांवर लोकप्रतिनिधींच्या देखत बुलडोझर चालवले व पुनर्वसनही करण्यात आले नाही. यामुळे विस्थापितांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन रहिवाशांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींच्या डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्तकायदा धाब्यावर बसवून काढले अतिक्रमण काढल्याचा आरोपउपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

भुसावळ, जि.जळगाव : येथील रेल्वे हद्दीतील रहिवाशांचा रेल्वे प्रशासनाने भविष्याचा कोणताही विचार न करता बेघर करून, घरांवर लोकप्रतिनिधींच्या देखत बुलडोझर चालवले व पुनर्वसनही करण्यात आले नाही. यामुळे विस्थापितांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन रहिवाशांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले.रेल्वे प्रशासनाने रेल्वे हद्दीत ब्रिटिशकालीन रहिवास असतानासुुद्धा शहरातील हद्दीवाली चाळ, आरपीएफ बँरेक, भीमवाडी, चांदमारी चाळ, आगवालीचाळ तसेच प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, पाच या भागातील रहिवाशांचे संसार क्षणातच उद्ध्वस्त करून राखरांगोळी केली. वास्तविक महाराष्ट्र शासनाने २०१० पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित केलेली असताना आमच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता नियम धाब्यावर ठेवून रस्त्यावर आणले. ज्याप्रमाणे जालियनवाला बागेच्या हत्याकाडांप्रमाणे त्यावेळेस लोकांची अवस्था झाली होती त्याच पद्धतीने रेल्वे प्रशासनाने आम्हाला गोरगरीब समाजाच्या घरांवर बुलडोझर चालवून किड्या-मुंग्याप्रमाणे घरे नष्ट केली. आमच्या मुलांच्या भविष्याचा काहीएक विचार केला नाही. एखादी नैसर्गिक आपत्ती, भूकंप व महापूर याप्रमाणे आमची घरे डोळ्यादेखत मातीच्या ढिगाºयाखाली दाबली गेली. आमचे भविष्यही हरपले गेले आणि हे सर्व चित्र सुरू असताना लोकप्रतिनिधी मात्र बघत होते. संसार रस्त्यावर आल्यानंतर पुनर्वसनासाठी तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ, अशी खोटी आश्वासने दिली. जर लोकप्रतिनिधींना या गोष्टीची आधीच कल्पना होती त्यांनी आधीच आमचे पुनर्वसन का केले नाही? का आम्हाला हक्काचे घर दिले नाही, असा आरोप केला आहे.निवेदनामध्ये अशा पद्धतीने समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केले आहेत. सर्व अतिक्रमित प्रभावित नागरिक लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही निवेदनात म्हटल आहे.निवेदनावर राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, संजय घोडके, कमलाबाई निकम, आशा घोडस्वार, मंगल साळवे, रंजना साळवे, वैशाली महाले, निर्मला लेमोसे, शोभा इंगळे, आरती बोदडे व शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ