शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेला मुलगा विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 18:51 IST

चोपडा शहरातील साने गुरूजी कॉलनीत आज मकर संक्रातीच्या दिवशी आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवित असलेल्या १३ वर्षीय मुलाचा पतंग तारांमध्ये अडकल्याने तो आसारीच्या साह्याने काढण्यासाठी गेला असता मुख्य वाहिन्यांच्या तारांमधील विजेचा धक्का बसून हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देसातवीत शिकणारा ओम पवार ५० टक्के भाजलाचोपड्यातून धुळे आणि तेथून नाशिकला उपचारासाठी हलविलेकॉलनी परिसरात वीज तारांचे धोकेदायक जाळे

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.१४ : येथील साने गुरुजी कॉलनीतील रहिवासी व पंकज विद्यालयात इ ७ वी त शिकणारा विद्यार्थी ओम नरेंद्र पवार (१३) हा रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेला असता मेन लाईनच्या तारांमधील विजेचा जबर शॉक लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, सनपुले, ता. चोपडा येथील आश्रमशाळेतील शिक्षक नरेंद्र पवार यांच्या साने गुरुजी कॉलनीत असलेल्या घराच्या छतावर त्यांचा मुलगा ओम हा पतंग उडवित होता. त्याचा पतंग मेनलाईनच्या तारेत अडकल्याने हा पतंग लोखंडी आसारीने काढत असतांना ओमला विजेचा जबर धक्का बसला. यावेळी तो फेकला गेला परंतु घराच्या छताच्या पडदीत अडकल्याने छतावरून खाली कोसळण्यापासून वाचला. त्याच वेळी सदर तार तुटली व मोठा स्फोटासारखा आवाज झाला. हा आवाज एवढा मोठा होता की, कॉलनीतील सर्व जण कसला स्फोट झाला हे पाहण्यासाठी घराबाहेर आले. यावेळी ओमचे वडील देखील छतावर गेले व त्यांनी मुलाला लाकडाच्या साहाय्याने बाजूला केले. हा मुलगा या दुर्घटनेत जवळपास ५० ते ६० टक्के भाजला गेला असून त्याच्या संपूर्ण अंगावरील कातडी निघून गेली आहे. तर छातीला आणि पोटाला जबर मार लागला आहे. दरम्यान, त्याला तातडीने उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याची स्थिती गंभीर असल्याने त्याला धुळे येथे हलविण्यात आले, मात्र धुळे येथूनही त्याला नाशिक येथे उपचारासाठी नेण्यात आल्याचे समजले आहे.दरम्यान, या परिसरात विजेच्या मुख्य वाहिन्याचे जाळे असल्याने वर्ष दोन वर्षात असा अपघात घडत असल्याचे कॉलनीतील लोकांनी सांगितले. या मुख्य वीज वाहिनीच्या तारा कॉलनीतून बाहेर हलविण्याची मागणी यावेळी अनेक नागरिकांनी केली.