शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

मुलगा सारखी चिडचिडच करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:12 IST

तुम्हाला सांगते डॉक्टर, आमचा सोनू तसा खूप हुशार, समजदारही म्हणा हवं तर. पण सध्या फारच चिडचिड करतोय. काहीही विचारा चांगलं-वाईट; चिडूनच उत्तर मिळणार. कैकवेळा विचारले, काय झाले चिडायला? तर काही नाही हे उत्तर ठरलेलेच. असा का बरं वागत असेल हा? सोनूच्या आईला पडलेला हा प्रश्न बहुतेक पालकांना पडलेला असतो.मुलांची होणारी ...

तुम्हाला सांगते डॉक्टर, आमचा सोनू तसा खूप हुशार, समजदारही म्हणा हवं तर. पण सध्या फारच चिडचिड करतोय. काहीही विचारा चांगलं-वाईट; चिडूनच उत्तर मिळणार. कैकवेळा विचारले, काय झाले चिडायला? तर काही नाही हे उत्तर ठरलेलेच. असा का बरं वागत असेल हा? सोनूच्या आईला पडलेला हा प्रश्न बहुतेक पालकांना पडलेला असतो.मुलांची होणारी चिडचिड बहुतेक पालकांना एकतर अनाठायी वाटते. नाही तर खूपच गंभीर वाटते. काही काही पालकांना असेही वाटते की, मुलगा हाताबाहेर चाललाय किंवा त्याला आपले सांगणे आवडत नाही. कित्येक पालकांना असे वाटते की, हा मूळातूनच चिडका आहे. त्यामुळे तसा शिक्का मारायलाही ते कमी करत नाहीत. समजदार पालकांना वाटते, आपले तर काही चुकत नाही ना? ते मुलांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात पण बहुधा असफलच होतात.मानसशास्त्रीय दृष्टीने पाहता एखाद्या मुलाची चिडचिड होणे हे मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण असते. हे अस्वास्थ्य अनेकविध कारणामुळे असू शकते.झपाट्याने होणारी वाढमुलांची वाढ ही फारच झपाट्याने होत असते. त्यामुळे जे शारीरिक बदल होतात त्यास जुळवून घेणे कित्येकदा मुलांना अवघड जाते. नवीन फुटलेल्या मिशा, गालावर येणारे पुरळ, मुलींमध्ये वा मुलांमध्ये होणारे लैंगिक अवयवातील बदल इत्यादी. आपण मोठे होत आहोत ही भावना निर्माण तर होते. पण त्याचबरोबर लज्जेची भावनाही निर्माण होत असते. जी मुलाच्या चिडचिडपणाला कारण ठरते.शालेय ताणतणावशालेय जीवन मुलांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असते. त्याचा मुलांच्या भावजीवनावर ताण पडत असतो. हा ताण वय व वर्गानुसार भिन्नभिन्न असतो. उदा.शिशुला शाळेत आईपासून आपण दूर कसे राहणार हा ताण असतो, तर थोड्या मोठ्या बालकाला वर्गात शिक्षक वा वर्गमित्र कसे वागणार याचा ताण असतो. याशिवाय काही काही मुलांना करिअर व टक्केवारीचा ताण असतो. त्याच्याशी जुळवताना जी कसरत चालते त्यातून चिडचिडपणा निर्माण होण्याची शक्यता असते.- डॉ.नीरज देव

टॅग्स :Jalgaonजळगाव