शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीतील दोन्ही गावे सक्तीने बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:21 IST

शिरसोली : शिरसोली जळगाव जवळ असल्याने या गावात कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ...

शिरसोली : शिरसोली जळगाव जवळ असल्याने या गावात कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिरसोली प्र. बो व प्र. नं. ही दोन्ही गावे पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहेत.ग्रामस्थांनी याचे तंतोतंत पालन करावे; अन्यथा पाच हजार रुपये दंड आकरण्यात येईल, असे ग्रामपंचायतीने कळविले आहे. दरम्यान, उघडी असलेली दुकाने व हातगाड्या तडकाफडकी बंद करण्यात आल्या आहेत.कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जळगाव जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. परंतु १ मे पासून काही ठराविक उद्योगधंदे व आस्थापने सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने प्रत्येक ठिकाणी पहिल्यासारखी गर्दी उसळली. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत जाऊन ती आज १७२ला भिडली आहे. अशा परिस्थितीत खऱ्या लॉकडाउनची गरज आता असताना सगळीकडे गर्दी होताना दिसत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नव्याने आदेश काढून रविवारपासून जळगाव शहरात पुन्हा लॉकडाउनच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिरसोलीही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिरसोली हे गाव जळगावपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असून येथील दोन्ही गावांची लोकसंख्या व दाटवस्ती पाहता या गावाला कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिरसोली प्र. बो. व शिरसोली प्र. नं. या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीनी उघडी असलेली आस्थापने, दुकाने व हातगाड्या १७ मेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असून जो कुणी दुकान उघडेल, त्याला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे.ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बडगे, रामभाऊ भिल, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, भागवत ताडे, गोरख बारी, श्रीराम ताडे, पोलीस पाटील शरद पाटील यांनी प्रत्येक दुकानात जाऊन ते बंद करण्याची ताकीद दिली.शिरसोलीत शुकशुकाटसकाळी ११ वाजेच्या सुमारास मेडीकल व किराणा दुकाने वगळता सर्व दुकाने व हातगाड्या बंद केल्याने शिरसोली येथील बाजार विभाग व गावात शुकशुकाट पहावयास मिळाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव