शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोटची दोन्ही पोरं सोडून गेली, मी आता जगून तरी काय करू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 21:38 IST

जामनेर रस्त्यावरील दीनदयाल नगर समोरील तिरुपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजाजवळ खेळत असताना पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून ७ रोजी संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने या मुलांच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी जगून काय करू, मला जगायचे नाही असा टाहे ती फोडत आहे.

ठळक मुद्देलहान भावाला वाचविताना शॉक लागून झाला मोठ्या भावाचाही मृत्यू ;खटके उडाले म्हणून आले भुसावळाततीन महिन्यांपूर्वी आले होते भुसावळात

वासेफ पटेल ।लोकमत न्यूज नेटवर्कभुसावळ : शहरातील जामनेर रस्त्यावरील दीनदयाल नगर समोरील तिरुपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजाजवळ खेळत असताना पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून ७ रोजी संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने या मुलांच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी जगून काय करू, मला जगायचे नाही असा टाहे ती फोडत आहे.विरोध करूनही मुले गेले होते खेळायलाया मुलांची आई आशा शंकर राखुंडे हिने विरोध करूनही शनिवारी सायंकाळी गणेश (वय ११), दीपक (वय १२) हे खेळायला गेले. पकडापकडी खेळत असताना गणेश हा मधूनमधून कारंजातील पाण्यामध्ये हात टाकत होता व अशातच गणेशचा पाय घसरून तो कारंज्यात पडला. यावेळी शॉक लागल्यानंतर तो थरथर करत असताना मोठा भाऊ दीपकला वाटले की, भावाला अचानक थंडी भरून आली म्हणून तो त्याला आधार देण्यासाठी खाली उतरला, मात्र तो जिवंत वर आलाच नाही.खटके उडाले म्हणून आले भुसावळातमुलांची आई आशा शंकर राखुंडे ही धुळे येथे राहत होती, परंतु पती शंकर भगवान राखुंडे हा व्यसनी असल्यामुळे दोघांचे नेहमीच खटके उडायचे. यामुळे आशा राखुंडे ही दोन्ही मुलं आणि मुलीला घेऊन तीन महिन्यांपूर्वी भुसावळ येथे आली होती मात्र नियतीला काही औरच मान्य असल्यामुळे हा प्रसंग घडला.पिंटू कोठारी धावले मदतीलानगरसेवक पिंटू कोठारी यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी लागलीच दोन वाहने थांबवून या दोघा भावंडांना रुग्णालयात हलविले, पण त्यांचा मृत्यू झाला होता. कोठारी यांनी या अत्यंत गरीब कुटुंबाला आर्थिक सहकार्यदेखील केले. तर शासनाने देखील या कुटुंबास तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त पेट्रोल पंपावर लावण्यात आला आहे.बहीण नंदिनी वाचलीदोन्ही भाऊ विजेच्या धक्क्याने दगावल्याची माहिती मिळताच त्यांना वाचण्यासाठी धावात सुटलेली बहीण नंदिनी (वय १३) ही पण त्यांच्याजवळ जाणार तोवर उपस्थित जनसमुदायाने तिला पकडल्यामुळे नंदिनीचा जीव वाचला.मुलांच्या आईचा वाहनाखाली झोकण्याचा प्रयत्नहे कुुटुंब जामनेररोड वरील एका झोपड्यात राहत होते. २४ तास वाहतुकीची या ठिकाणी वर्दळ असते. याठिकाणी ८ रोजी सकाळपासून दुपारपर्यंत अनेक वेळा स्वत:ला वाहनाखाली निराशेपोटी झोकण्याचा प्रयत्न आशाबाईने केला मात्र काही वेळेस आजुबाजुच्यांनी तर काही वेळेस स्वत: वाहनधारकांनीच वाचविले. 

टॅग्स :Deathमृत्यूBhusawalभुसावळ