शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पोटची दोन्ही पोरं सोडून गेली, मी आता जगून तरी काय करू? - आईने फोडला हंबरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 21:44 IST

: खेळत असताना लहान भावाला वाचवताना शॉक लागून झाला मोठ्या भावाचाही मृत्यू

वासेफ पटेल ।भुसावळ : शहरातील जामनेर रस्त्यावरील दीनदयाल नगर समोरील तिरुपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजाजवळ खेळत असताना पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून ७ रोजी संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने या मुलांच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी जगून काय करू, मला जगायचे नाही असा टाहे ती फोडत आहे.विरोध करूनही मुले गेले होते खेळायलाया मुलांची आई आशा शंकर राखुंडे हिने विरोध करूनही शनिवारी सायंकाळी गणेश (वय ११), दीपक (वय १२) हे खेळायला गेले. पकडापकडी खेळत असताना गणेश हा मधूनमधून कारंजातील पाण्यामध्ये हात टाकत होता व अशातच गणेशचा पाय घसरून तो कारंज्यात पडला. यावेळी शॉक लागल्यानंतर तो थरथर करत असताना मोठा भाऊ दीपकला वाटले की, भावाला अचानक थंडी भरून आली म्हणून तो त्याला आधार देण्यासाठी खाली उतरला, मात्र तो जिवंत वर आलाच नाही.खटके उडाले म्हणून आले भुसावळातमुलांची आई आशा शंकर राखुंडे ही धुळे येथे राहत होती, परंतु पती शंकर भगवान राखुंडे हा व्यसनी असल्यामुळे दोघांचे नेहमीच खटके उडायचे. यामुळे आशा राखुंडे ही दोन्ही मुलं आणि मुलीला घेऊन तीन महिन्यांपूर्वी भुसावळ येथे आली होती मात्र नियतीला काही औरच मान्य असल्यामुळे हा प्रसंग घडला.पिंटू कोठारी धावले मदतीलानगरसेवक पिंटू कोठारी यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी लागलीच दोन वाहने थांबवून या दोघा भावंडांना रुग्णालयात हलविले, पण त्यांचा मृत्यू झाला होता. कोठारी यांनी या अत्यंत गरीब कुटुंबाला आर्थिक सहकार्यदेखील केले. तर शासनाने देखील या कुटुंबास तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त पेट्रोल पंपावर लावण्यात आला आहे.बहीण नंदिनी वाचलीदोन्ही भाऊ विजेच्या धक्क्याने दगावल्याची माहिती मिळताच त्यांना वाचण्यासाठी धावात सुटलेली बहीण नंदिनी (वय १३) ही पण त्यांच्याजवळ जाणार तोवर उपस्थित जनसमुदायाने तिला पकडल्यामुळे नंदनीचा जीव वाचला.वाहनाखाली झोकण्याचा मुलांच्या आईचा प्रयत्नहे कुुटुंब जामनेररोड वरील एका झोपड्यात राहत होते. २४ तास वाहतुकीची या ठिकाणी वर्दळ असते. याठिकाणी ८ रोजी सकाळपासून दुपारपर्यंत अनेक वेळा स्वत:ला वाहनाखाली निराशेपोटी झोकण्याचा प्रयत्न आशाबाईने केला मात्र काही वेळेस आजुबाजुच्यांनी तर काही वेळेस स्वत: वाहनधारकांनीच वाचविले.भांडी धुऊन व कचरा वेचून ओढायचे संसाराचा गाडाधुळे येथून भुसावळला आल्यानंतर आशा राखुंडे ही पोटाची खळगी भरण्यासाठी सिंधी कॉलनीमध्ये लोकांचे भांडी घासायची तर मुलंही रस्त्यावरील कचरा उचलून संसाराचे गाडा ओढण्यासाठी आईला मदत करत होते.