शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाप-लेकावर दोघांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:26 IST

जळगावातील घटना

ठळक मुद्दे मानेवर घेतला चावा, पैशाचा वाद

जळगाव : हात उसनवारीने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही पुन्हा पैसे द्यावे म्हणून खलीलोद्दीन कुतुबोद्दीन शेख (वय ५२) व त्यांचा मुलगा परवेज शेख या दोघांवर फायटर व धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजता कासमवाडी येथील बाजारपट्ट्यात घडली. दरम्यान, हल्लेखोर सागर पाटील व यश गोयल उर्फ मॉडेल या दोघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली.खलीलोद्दीन शेख हे पाईप फिटींगचा व्यवसाय करतात. या व्यवसायासाठी शेख यांनी कमलबाई नावाच्या महिलेकडून ५० हजार रुपये हातउसनवारीने घेतले होते. काही दिवसानंतर एकवेळा ३० हजार व दुसऱ्यावेळी २० हजार असे दोन टप्प्यात पूर्ण पैसे परत केले होते, परंतु तरीही कमलबाईकडून पैशाची मागणी होत होती. अशातच बुधवारी रात्री काम आटोपून शेख व त्यांचा मुलगा परवेज घरी जात असताना कासमवाडीतील बाजारपट्ट्यात उर्दू शाळेजवळ सागर पाटील व गोयल यांनी रस्त्यात अडवून कमलबाईचे पैसे दे म्हणत सागर याने फायटरने खलीलोद्दीन यांना मारहाण केली. तर गोयल याने मानेवर चावा घेऊन दगडाने डोके फोडले. वडीलांना सोडविण्यासाठी आलेल्या परवेज याच्यावरही धारदार पट्टीने हल्ला केला.याआधीही वादाची पार्श्वभूमीसागर याने याआधी देखील पांडे चौकात भूषण पाटील या तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखविला होता असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जखमीचा जबाब घेतल्यानंतर गुुरुवारी सागर व गोयल या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील व सचिन पाटील यांनी दोघांना अटक केली.दोन खून केले आहेत...या घटनेत रक्तबंबाळ अवस्थेत पाहून सागर व गोयल या दोघांनीच शेख यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले व तेथे अपघात झाला असेच सांग म्हणून दम दिला. याआधी मी दोन खून केले आहेत, तुला आम्ही मारले असे कोणाला सांगितले तर तुम्हा बापलेकाचे मर्डर करु अशी धमकी देत दोन्ही जण रुग्णालयातून निघून गेले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी