शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : त्याच त्या आश्वासनांना आता कंटाळलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:56 IST

नंदुरबार ते अक्कलकुवा ६५ किमी

मनोज शेलारनंदुरबार : वर्षानुवर्षे तेच ते प्रश्न, समस्या कायम आहेत. दरवेळी आश्वासने मिळतात, परंतु प्रश्न सुटत नाहीत. असे असले तरी योजनांच्या अंमलबजावणीची गती वाढली, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या या बाबीदेखील नाकारून चालणार नाही असा एकूणच सूर नंदुरबार-अक्कलकुवा प्रवासादरम्यान विद्यार्थी व नोकरदारांकडून ऐकावयास मिळाला.नंदुरबार ते अक्कलकुवा प्रवासात एकूणच निवडणुकीविषयी नागरिकांच्या मनात काय चालले याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या नंदुरबार-अक्कलकुवा या निझरमार्गे धावणाऱ्या बसमध्ये बहुतांश अपडाऊन करणारे नोकरदार आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थीच जास्त होते. बसने नंदुरबार सोडल्यानंतर जवळ बसलेल्या काहींना निवडणुकीविषयी बोलते करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नोकरदार बोलण्यास कचरले, परंतु मुद्यांना हात घालताच त्यांनी विविध बाबींवर मते मांडली. सातपुड्यात आजही बेरोजगारी, स्वयंरोजगाराचा अभाव, उत्पादीत होणाऱ्या आंबा, सीताफळ, महूफुले यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग हे प्रश्न आहेत. दळणवळणाची सुविधा काही प्रमाणात सुधारली आहे. दºयाखोºयात मोबाइल नेटवर्क मिळू लागले आहे. वाहने जाऊ लागली आहेत. परंतु हाताला काम नाही त्याचे काय? असा प्रश्न एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने उपस्थित केला. दरवर्षाचे स्थलांतर पाचवीला पुजलेले आहे. आश्वासने मिळतात, परंतु कामाचा ठिकाणा नाही. कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे सरकारी आकडे कागदावर रंगविले जातात. गरोदर महिला, माता मृत्यू यांचे प्रमाण जैसे थे आहे. मलिदा खाणारे गब्बर तर आदिवासी अधिकच कुपोषित होत चालले आहेत. कुठे आहेत योजना आणि कोण त्या राबवित आहेत याचेही सोशल आॅडिट होणे गरजेचे असल्याचा सूर बसमधील बहुतेक सुशिक्षित मतदारांनी व्यक्त केला.‘विकास’ची तुलना...प्रवासात गुजरात हद्दीतील १५ ते २० किलोमीटरचा भाग होता. त्या भागातील प्रवासीही बसमध्ये होते. त्यांनीही ‘विकासा’ची तुलना केली. त्यांच्याही आदिवासी भागातील समस्या काही वेगळ्या नाहीत. हे चर्चेवरून स्पष्ट झालेच.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव