शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शाळांवर होताहेत पुस्तके जमा; नवीन शैक्षणिक वर्षात होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व पालकांना मागील वर्षाची पुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन केले आहे. त्यानुसार ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व पालकांना मागील वर्षाची पुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन केले आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातील काही शाळांनी शालेय पोषण आहार वितरणाच्या निमित्ताने पालकांकडून पुस्तके जमा करून घेतली आहेत. ही पुस्तके नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार आहेत.

मागील वर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे ४ लाख २२ हजारांच्या वर विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक विभागाची वर्षभर शाळा भरलीच नाही. तर ५ ते ८ वीपर्यंतची २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात आली. मात्र, त्यांचेही वर्ग काही दिवसच भरले. त्यामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या पुस्तकांचा पाहिजे तसा वापरच झाला नसल्याने पुस्तके जशीच्या तशीच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना मागील वर्षीची पुस्तके परत करण्याची विनंती केली आहे. याबाबत शाळांनी पालकांना कल्पना दिली होती. त्यानुसार काही पालकांनी शाळांवर पुस्तके जमा केली आहेत. तर काही शाळांवर एकाही पालकाने पुस्तके जमा केलेली नाहीत.

कागदाची होणार बचत

पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कागदांची बचत होणार असून, या माध्यमातून होणारा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागू शकतो.

नवीन शैक्षणिक वर्षात वितरण

शाळांवर जमा केलेली पुस्तके ही नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशित लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरण केली जाणार आहेत. दरम्यान, किती पालकांनी शाळांवर पुस्तके जमा केली, याबाबतची आकडेवारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली नाही.